शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोटगी टाळण्यासाठी पतीने दाखल केला खोटा पुरावा, पत्नीला दरमहा ५ हजार रुपये देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:11 IST

पुणे : पत्नीला पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून न्यायालयात वेतनाची खोटी पावती सादर करणा-या पतीचा उद्योग न्यायालयात उघड झाला.

पुणे : पत्नीला पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून न्यायालयात वेतनाची खोटी पावती सादर करणा-या पतीचा उद्योग न्यायालयात उघड झाला. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दावा दाखल केलेल्या पतीला दरमहा ५ हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश खडकी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. जोशी यांनी दिला.अर्जदार पत्नी आणि तिच्या पतीचे ठरवून लग्न झाले होते. वडिलांनी लग्नात सात लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतरही सासरच्या लोकांकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू करण्यात आला. तिला घरातील कामे येत नाहीत. कपडे व्यवस्थित धूत नाही. ती क्षय रुग्णासारखी दिसते म्हणून टोमणे मारण्यात येत असत. त्यानंतर तिला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले. पुन्हा तिला ते परत घेऊन गेले नाहीत. तिच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा प्रयत्न करूनही तिला नेण्यास त्यांनी नकार दिला.या प्रकरणी पीडितेने अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. पतीकडून पोटगी अणि घरभाड्यापोटी रक्कम मिळावी, अशी मागणी त्यांनी दाव्यात केली होती. तिच्या पतीने शाळेतून तीन हजार रुपये पगार मिळत असल्याची वेतन पावती न्यायालयात दाखल केली. त्याचा हा खोटा पुरावा अ‍ॅड. मुळे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला.कोणत्याही शासनमान्यताप्राप्त शाळेत इतके कमी वेतन दिले जात नाही. त्याबाबत असलेली अधिसूचना मुळे यांनी न्यायालयात दाखल केली. सरकारच्या अधिसूचनेनुसार शाळेत इतका कमी पगार नाही. त्यापेक्षा जास्त पगार आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून पत्नीला दरमहा ५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.तांत्रिकाकडून विभूती आणून तिला पाण्यात टाकून प्यायला लावली जात असे. तसेच, गारगोटीचे दगड तिच्या अंथरुणाखाली ठेवण्यात येत. तिला मुलगा व्हावा म्हणूनही तिचा छळ केला जात असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मोबाईलदेखील तपासण्यात येई.याशिवाय, रात्री उशिरा दारू पिऊन तिला शिवीगाळ आणि मानसिक छळ तो करत असे. अगदी ती गर्भवती असताना गर्भपात व्हावा म्हणून तिला गोळ्या खाण्यास भाग पाडले गेले.

टॅग्स :Mumbaiमुंबई