शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भात सर्वदूर पावसाचे प्रमाण वाढले असून बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भात सर्वदूर पावसाचे प्रमाण वाढले असून बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मराठवाड्यातील जालना, बीड तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. शिरूर ७०, कोपरगाव ६०, भोकरदन ७०, विदर्भातील भिवापूर ८० मिमी पावसाची नोंद झाली होती. अन्यत्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मंगळवारी दिवसभरात परभणी १९, अकोला ११, नागपूर १६, वर्धा १०, मुंबई ९, चंद्रपूर ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील औरंगाबाद तसेच जालना, बीड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस सर्वदूर मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे शहरात बुधवारी आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.