शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकास प्रकल्पाला विरोधच, सर्वसाधारण सभेत विरोधात ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:19 IST

गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पैसे भरून गाळे घेण्याची मानसिकता दलालांची नाही

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पैसे भरून गाळे घेण्याची मानसिकता दलालांची नाही, आडत्यांचे प्रस्थापित धंदे बंद करून त्यांना विस्थापित करू नका, बाजार समितीने सध्या गाळ्यातील वाढीव जागेची वाजवी रक्कम घेऊन गाळे द्यावेत, जागा उपलब्ध करून देऊन नव्याने मार्केट यार्डाची उभारणी व्हावी, आदी मागण्यांसह विविध सूचनांचा पूर गुरुवारी मार्केट यार्डातील शेतकरी निवास येथे आयोजित आडत्यांच्या बैठकीत निघाला. या वेळी बाजार समितीच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेला ७५० कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पास आडत्यांनी एकमताने ठराव करत विरोध दर्शविला. परिणामी, बाजार समिती प्रशासक मंडळाला हा प्रकल्प गुंडाळावा लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागातील मंडईचा प्रस्तावित ७५० कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आडते असोसिएशन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी, बाजार समिती प्रशासक मंडळांच्या पदाधिकºयांकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांसह विविध पदाधिकारी तसेच आडते यादरम्यान उपस्थित होते.मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या इमारतीच्या काही भागास तीस ते पस्तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे समिती प्रशासनाने येथील सर्व गाळे पाडून नव्याने उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या प्रकल्पास पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी तत्त्वत: मान्यता देत बाजार समितीने यात लक्ष द्यावे, असे देशमुख यांनी सांगितलेहोते.प्रशासनाने आडत्यांना विचारात न घेता संबंधित प्रकल्पाचा आराखडादेखील तयार करून आडते असोसिएशनच्या पदाधिकाºयांना दाखविला होता. प्रकल्पासाठी आडत्यांना आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने आडते असोसिएशनने त्यावर चर्चा न करता निर्णय घेणे टाळले होते. अखेर गुरुवारी आडत्यांच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला.