शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपदाचा पुन्हा खेळ

By admin | Updated: January 5, 2017 03:42 IST

नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची सदस्यसंख्या कमी झाल्याने त्यांच्यापेक्षा जास्त सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विरोधी पक्षनेतेपद द्यावे

पुणे : नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची सदस्यसंख्या कमी झाल्याने त्यांच्यापेक्षा जास्त सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असे पत्र गटनेते किशोर शिंदे यांनी बुधवारी महापौर प्रशांत जगताप यांना दिले. महापौर जगताप यांनी यावर गुरुवारी (दि. ५) निर्णय घेणार असल्याचे त्यांना सांगितले. काँग्रेसने मात्र याची खिल्ली उडवली असून हिंमत असेल तर मनसेने रिक्त जागांवर आपले उमेदवार निवडून आणावे, असे आव्हानच काँग्रेसचे गटनेते व विद्यमान विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी दिले आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांमधून रोज गळती होत आहे. पक्षांतर करण्याबरोबरच पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई होण्याच्या भीतीने नगरसेवकपदाचा राजीनामाही देत आहेत. पालिकेतील त्यांची सदस्यसंख्या २९ होती. मनसेची एकने कमी म्हणजे २८ होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले. मात्र आता नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची सदस्यसंख्या २३ झाली आहे. मनसेमधूनही काही नगरसेवकांचे पक्षांतर झाले असले तरी त्यांच्या एकाही सदस्याने अद्याप नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्याचाच आधार घेत मनसेने विरोधी पक्षनेतेपदाची मागणी महापौरांकडे केली आहे. या पदावर नियुक्ती करण्याचे अधिकार महापौरांकडे आहेत. त्यामुळे त्यांना पत्र दिले असल्याचे किशोर शिंदे यांनी सांगितले. मनसेचे संपर्कनेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर चर्चा केली असून महापौर प्रशांत जगताप यांनी या विषयावर लगेचच म्हणजे गुरुवारी निर्णय घेऊ, असे सांगितले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.दरम्यान, काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी या मागणीची खिल्ली उडवली. नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे त्या जागा रिक्त आहेत. निवडणूक होऊन त्या जागा भरल्या गेल्यानंतरच हा प्रश्न उपस्थित होतो. हिंमत असेल तर मनसेने त्या जागा लढवाव्यात, जिंकाव्यात व नंतरच मागणी करावी, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली. पदे मागून मिळत नसतात, ती मिळवावी लागतात, हे किमान पाच वर्षांनंतर तरी मनसेच्या लक्षात यायला हवे होते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)