शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; नवनियुक्त चेअरमन अनुपम खेर यांना विद्यार्थ्यांनी पाठविले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:00 IST

केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का?

पुणे : केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का? असा सवालच एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने उपस्थित केला आहे. याशिवाय संस्थेच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेणारे पत्र नवनियुक्त चेअरमन अनुपम खेर यांना पाठविले आहे.एफटीआयआयचे माजी चेअरमन गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल सहा महिने शासनाविरुद्ध आंदोलन केले, परंतु भविष्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये, यासाठी श्रेयांक पद्धत लागू करून विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमावर लक्ष्य केंद्रित करावे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले. मात्र, एफटीआयआय हे सर्जनशील कलाकार निर्माण करण्याचे व्यासपीठ असल्याने प्रशासनाकडून उपक्रमाच्या नावाखाली चालविल्या जाणाºया गोष्टींवरच आक्षेप घेत, खेर यांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्टुडंट असोसिएशनने केला आहे.सुविधा, दुरुस्तीसाठी रक्कम खर्च करावीएका वर्षांपासून प्रशासन ‘ओपन डे’,‘फाउंडेशन डे’सारख्या उपक्रमांवर पैसा खर्च करीत आहे. त्यापेक्षा संस्थेमधील मूलभूत सुविधांसह आवश्यक साधनांच्या दुरुस्तीसाठी ही रक्कम खर्च केली, तर विद्यार्थ्यांना वेळेत प्रकल्प सादर करता येतील. तीन दिवसांत ८ तासांच्या शिफ्टवरून दोन दिवस १२ तासांची शिफ्ट दिली आहे. हे अन्यायकारक आहे. फेब्रुवारीत नियामक मंडळाने शैक्षणिक अभ्यासक्रम, शुल्क पद्धत याविषयीच्या चर्चेमधून विद्यार्थी प्रतिनिधीला वगळण्याचा घेतलेला निर्णयही असंवैधानिक आहे, असे संघटनेने पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :FTIIएफटीआयआय