शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची संधी!

By admin | Updated: February 16, 2017 02:45 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका छापून

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका छापून तयार झाल्या आहेत. यामुळे निवडणूक प्रशासनाने पोस्टल मतदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. शहर आणि जिल्ह्यातील निवडणूक कामांसाठी नियुक्त केलेल्या तब्बल ६५ हजार कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद निवडणूक समन्यवय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी पोस्टल मतदानाचा अधिकार दिला आहे. यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्र देतानाच पोस्टल मतदान करण्यासाठीच्या अर्जांचे वाटप करण्यात आले. या पत्रामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या मतदारसंघात नाव आहे, याबाबत सविस्तर माहिती भरून आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे हा अर्ज द्यावा लागणार आहे. पुणे शहरात निवडणूककामासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे खेड तालुक्यात मतदान असल्यास संबंधित निवडणूक अधिकारी हा अर्ज खेड तालुक्यात पाठवून देईल. त्यानंतर हा अधिकारी त्या मतदारसंघातील गट-गण किंवा प्रभागातील उमेदवारांची मतदान पत्रिका पुन्हा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवून देणार आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी एकाद्या अधिकाऱ्यांच्यासमोर गुप्त पद्धतीने मतदान करून ही मतपत्रिका सीलबंद करून पोस्टाने अथवा थेट संबंधित मतदान अधिकाऱ्यांकडे पोहोचविण्यात येणार आहे. मतदानपत्रिका मतदारांपर्यंत पोहोचविणे व मतदान करून पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे ६५ हजार कर्मचाऱ्यांचे मतदान कारणी लागणार का, हे २३ फेबु्रवारीलाच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)