शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

व्यसनी कर्मचा-यांना पालिकेकडून सुधारण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

पुणे : महापालिकेच्या व्यसनी कर्मचा-यांना सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. जे कर्मचारी व्यसनमुक्त होऊ इच्छितात आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन ...

पुणे : महापालिकेच्या व्यसनी कर्मचा-यांना सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. जे कर्मचारी व्यसनमुक्त होऊ इच्छितात आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार घेऊन इच्छितात त्यांना दहा दिवसांची पगारी रजा दिली जाणार आहे. समाजाने तिरस्कार न करता त्यांना स्वीकारावे याकरिता त्यांचा सत्कारही केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

महापालिकेच्या आस्थापनेवर जवळपास सात ते आठ हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी काम करीत आहेत. त्यातही रस्ते झाडणारे, कचरा गाड्यांवर काम करणारे, इमारतींमध्ये झाडणकाम आणि स्वच्छतेची कामे करणारे, रुग्णालय आदी ठिकाणी काम करणारे कर्मचारी अनेकदा व्यसनांचे शिकार झालेले असतात. त्यांना दारु, तंबाखू, गुटखा आदींची व्यसने जडतात. त्याचा संसार आणि मुलांच्या जडणघडणीवरही विपरीत परिणाम होतो. पालिकेच्या यंत्रणेचा हिस्सा असलेल्या या कर्मचा-यांपैकी अनेकजण स्वत:हून व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार घेऊन बरे होऊन आलेले आहेत. त्यांच्यामध्ये बदलही घडलेले आहेत.

नुकत्याच पालिकेच्या एका कर्मचा-याने अशाच एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दहा दिवस राहून उपचार घेतले. त्याने पालिकेला दहा दिवसांचे बिल दिले. हे बिल मंजूर केल्यानंतर अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ज्या कर्मचा-यांना सुधारण्याची इच्छा आहे त्यांना संधी द्यायला हवी अशी भूमिका घेतली. यापुढे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी गेलेल्या कर्मचा-याला पगारी रजा दिली जाणार असून तेथील बिलही पालिका भरणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.