आळेफाटा : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास आज आळेफाटा येथील चौकात आदिवासी विकास आघाडीच्यावतीने झालेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनात तीव्र विरोध करण्यात आला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आदिवासी बचाव’ या घोषणांनी आळेफाटा परिसर दणाणून गेला.
धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश केल्यास जुन्नर तालुक्यात असणा:या धरणांतून खाली पाणी सोडण्यास विरोध करण्यासह हे आरक्षण लादणा:यांना रस्त्यांवर फिरू न देण्याचा इशारा यावेळी आदिवासी विकास आघाडी संस्थापक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवराम लांडे यांनी यावेळी दिला. यावेळी पुणो-नाशिक, नगर-कल्याण महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्या मात्र आदिवासींमध्ये घेऊ नका, असा इशारा यावेळी पंडित मेमाणो, काळू शेळकंद, मारूती वायाळे, बुधाजी शिंगाडे, दत्ता गवारी, लकी जाधव, रामदास बोकड, डॉ. संतोष सुपे यांनी दिला तर आदिवासींच्या स्वार्थासाठी मंत्र्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला, पाठिंबा देऊ असे दादाभाऊ बगाड यांनी सांगितले तर आरक्षणाला धक्का लावल्यास त्याची किंमतच निवडणुकीत मोजावी लागेल असे देवराम लांडे यांनी शेवटी बोलताना सांगितले. पुणो-पिंपरी चिंचवड नगरसेवक रामभाऊ बोकड, रोहिणी चिमटे, आशाताई सुपे, देवराम मुंडे, पंडित मेमाणो, शकुंतला दराडे, दादाभाऊ बगाड, अमोल लंपडे, दत्तात्रय कोकाटे. यावेळी उपस्थित होते.
4रास्ता रोको आंदोलनाच्या सुरुवातीला
माळीण येथील दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
4आदिवासी विकास आघाडी संस्थापक देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनात आदिवासी समाज मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. लोकसंख्येच्या जोरावर राजकीय हेतूने आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास याचा तीव्र निषेध करू.
4कातकरी समाज या रास्ता रोको आंदोलनात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
4नारायणगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रास्ता रोको मुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या़ वाहतुक ठप्प झाली होती़