शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विजयी पॅनलवर विरोधकांची दगडफेक

By admin | Updated: March 15, 2016 03:59 IST

साकोरी (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि.१३) रात्री विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निकालावरून विजयी झालेल्या पॅनलच्या समर्थकांवर बेकायदेशीर जमाव

बेल्हा/ निमगावसावा : साकोरी (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि.१३) रात्री विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निकालावरून विजयी झालेल्या पॅनलच्या समर्थकांवर बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक, काठ्यांनी मारहाण व गाड्यांचे नुकसान केल्याची घटना घडली. रात्री उशिरा या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत ८ जखमी झाले आहेत. सोमवारी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.रविवारी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांचे शिवनेर पॅनल तर उपसरपंच पांडुरंग साळवे यांचे शिवशक्ती पॅनल यांच्यात लढत झाली. मतदान झाल्यानंतर लगेचच काही वेळाने मतमोजणीही झाली. सर्व जागा पांडुरंग गाडगे यांच्या शिवनेर पॅनलने जिंकल्या. शिवनेर पॅनलचे सर्व समर्थक बाहेर जल्लोष करत असतानाच शिवशक्ती पॅनलच्या समर्थकांनी अचानक त्यांच्यावर दगडफेक तसेच काठ्यांनी मारहाण सुरू केली. अंधारामुळे दगड कोण मारत होते हे कळले नाही. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. योगेश येवले, बाबाजी पानसरे, सुरेश विश्वासराव, ज्ञानेश्वर शिंदे, शरद विश्वासराव, प्रकाश गुंजाळ, नवनाथ साबळे, जालिंदर शिंदे हे सर्वजण जखमी झाले. यापैकी काही जखमी उपचार घेऊन घरी आले आहेत तर ज्ञानेश्वर शिंदे यांना पुणे येथे उपचारासाठी नेले असल्याचे सांगण्यात आले.विरोधी गटाकडूनही मनोहर रभाजी विश्वासराव यांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. या नुसार शिवशक्ती पॅनलच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. दमदाटी केली व दगड फेकून मारले. सोमनाथ लोंढे, संजयसाळवे, मधुसूदन ज्ञानेश्वर बनकर, फिर्यादी स्वत: मनोहर विश्वासराव, किसन विश्वासराव यांना मार लागल्याचे फिर्यादित म्हटले आहे.(वार्ताहर)काल रात्रीच या ठिकाणी जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी भेट दिली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत. या ठिकाणी आज पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी भेट दिली व परिस्थीतीचा आढावा घेतला.