शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हेलिपॅड वापरास संरक्षण विभागाची हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:09 IST

जिल्हा प्रशासनाकडून नवीन शासकीय विश्रामगृहाच्या (व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस ) परिसरात बांधण्यात आलेल्या हेलिपॅडच्या वापरास संरक्षण विभागाने हरकत घेतली आहे.

पुणे : जिल्हा प्रशासनाकडून नवीन शासकीय विश्रामगृहाच्या (व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस ) परिसरात बांधण्यात आलेल्या हेलिपॅडच्या वापरास संरक्षण विभागाने हरकत घेतली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संरक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला हेलिपॅड वापरण्यात अडथळे येत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या पंचतारांकित नवीन शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हेलिपॅडची सोय आहे. या शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वतंत्र खोल्यांसह ३५ खोल्या आहेत. तसेच सभागृह व मिटिंग हॉलची सोय आहे. वेळेची बचत करण्यासाठी व वाहतुक कोंडीमुळे अनेकदा व्हीव्हीआयपी व्यक्तींना नियोजित ठिकाणी पोहचण्यात अडचणी येतात. त्यामुळे नवीन शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हेलिपॅडची सोय करण्यात आली होती. परंतु, जवळच लष्काराचे दक्षिण मुख्यालय असल्याने संरक्षण विभागाने हेलिपॅडचा वापर करण्यास हरकत घेतली. त्यामुळे विश्रामगृह हेलिपॅड हेलिकॅप्टरच्या प्रतिक्षेत आहे.राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच या हेलिपॅडचा वापर करणार असल्याचे हमीपत्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याच प्रमाणे त्याचा व्यावसायिक वापरासाठी उपयोग केला जाणार नाही,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.हेलिपॅड बांधण्यापूर्वी याबाबत संरक्षण विभागाची परवानगी घेण्यात आली होती. तसेच हेलिपॅडबांधून झाल्यानंतर त्याच्या वापर करण्यासाठी पूर्णत्त्वाचा दाखला मिळावा याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. बोर्डाने हा प्रस्ताव संरक्षण विभागाकडे पाठवला आहे. मात्र, सुमारे दीड ते दोन वर्षांपासून तो धूळ खात पडून आहे.