शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बीआरटी बसथांब्याचे दरवाजे उघडेच , पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:15 IST

बीआरटी मार्गातील बसस्टॉपचे दरवाजे, बस आल्यानंतर उघडणे अपेक्षित असताना संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गातील अनेक बसस्टॉपचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बस आल्यानंतर गर्दीत एखाद्याचा धक्का लागून प्रवाशाचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुणे : बीआरटी मार्गातील बसस्टॉपचे दरवाजे, बस आल्यानंतर उघडणे अपेक्षित असताना संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गातील अनेक बसस्टॉपचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बस आल्यानंतर गर्दीत एखाद्याचा धक्का लागून प्रवाशाचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहरात जलद वाहतुकीसाठी बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट अर्थात बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले. मात्र सुरुवातीपासूनच या मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.बीआरटी मार्गावरील बसस्टॉप हे रस्त्याच्या मधोमध तयार करण्यात आले आहेत. या बसस्टॉपला बसविण्यात आलेले काचेचे दार हे बस दरवाजासमोर आल्यानंतर आपोआप उघडते. यासाठी तेथे सेन्सर बसविण्यात आले आहेत. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावरील साठे बिस्किट, मेंटल कार्नर या बसस्टॉपचे दरवाजे हे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती इतर मार्गावरील बसस्थांब्यांची आहे.कुठली बस ही बसस्थानकात येत आहे, यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात आले आहे. तेथे बस येत असल्याचे प्रवाशांना कळते. अनेकदा हे एलईडी स्क्रीन बंद असतात किंवा जीपीएस यंत्रणेत बिघाड असल्यास अथवा बसमधील ही यंत्रणा बंद करून ठेवली असल्यास प्रवाशांना कुठली बस येत असल्याचे कळत नाही.अशातच अनेक प्रवासी हे या दरवाज्यांमधून वाकून बघत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने बस आल्यावर बसचा धक्का लागून एखाद्याचा प्राण जाऊ शकतो. त्याचबरोबर अनेक बसस्टॉपच्या दरवाज्यांना तडा गेला असल्याने ते केव्हा दुरुस्त करणार, असा प्रश्न आता प्रवासी विचारतात.याबाबत पीएमपीचे सहव्यवस्थापक अजय चारठाणकर म्हणाले, की बीआरटी बसस्टॉपच्या दरवाजांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. काही दरवाज्यांना तडा गेला आहे. हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीचे काम होऊ शकले नव्हते. आता बसस्टॉप देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम होणार आहे.बसथांब्याचे धानोरीत विद्रुपीकरणधानोरी : पुणे शहरासह उपनगरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे मुख्य साधन असलेल्या पीएमपीच्या बसथांब्यावर सर्रासपणे अतिक्रमण करून लावलेल्या अनधिकृत जाहिरातींमुळे बसथांब्याचे व परिणामी शहराचेही विद्रुपीकरण होत आहे. धानोरी परिसरातही अशीच परिस्थिती असून अनधिकृत जाहिरातींवर पालिकेने कारवाई करण्याची नागरिक मागणी करीत आहेत.धानोरीत सगळीकडच्याच बसथांब्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती लावलेल्या दिसून येतात. यामध्ये सिनेमा, सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रम, ‘प्लॉटिंग’ इत्यादी जाहिराती मोठ्या प्रमाणात असतात. यातील काही जाहिराती नागरिकांना मनस्ताप देणाºयाही असतात. बºयाच ठिकाणी बसथांब्यावर अश्लील चित्रपटाच्या जाहिरातीही लावलेल्या दिसून येतात. अशा अश्लील जाहिरातीमुळे पीएमपीने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो, असे स्थानिक नागरिक दिलीप डाळिंबकर यांनी सांगितले.पुणे शहरात सर्वांना सोयीची व परवडणारी पीएमपीची बससेवा आहे. मात्र बसथांब्यावर लावलेल्या अश्लील जाहिरातीमुळे आबालवृद्ध व स्त्रियांना मानसिक त्रासहोतो. भारतातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणचे विद्रुपीकरण सुजाण पुणेकरांना मानसिक वेदना देणारे आहे. तरी संबंधितांनी यावर त्वरित लक्ष देऊन पीएमपी बसथांब्यासारख्या सार्वजनिक ठिकाणचे विद्रुपीकरण थांबवावे. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या