शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या गव्हाचा काळाबाजार उघडकीस

By admin | Updated: June 17, 2016 05:18 IST

रेशनवरच्या तब्बल २00 पोती गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या तिघा जणांना खडक पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी २ लाख ९ हजारांचा गहू जप्त केला असून, अन्न व पुरवठा विभागाच्या

पुणे : रेशनवरच्या तब्बल २00 पोती गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या तिघा जणांना खडक पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी २ लाख ९ हजारांचा गहू जप्त केला असून, अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये औंध येथील खाणीत शेकडो पोती गहू फेकून देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच असा दुसरा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. शंकर गायकवाड, अजय मटकर, गोकुळ साबळे (सर्व रा. पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकारी उज्ज्वला सांगळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरच्या रेल्वे आरक्षण केंद्रासमोरील मोकळ्या जागेमध्ये आडोशाला काही लोक टेम्पोमधील धान्याची पोती एका ट्रकमध्ये भरत असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली होती. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे पेठेमध्ये एक टेम्पो आणि ट्रक अडवला. या वाहनांची तपासणी केल्यावर त्यामध्ये शासकीय शिक्का असलेली तब्बल २00 पोती गहू आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केला. अन्न व पुरवठा विभागाच्या सहायक अधिकारी सुचित्रा आमले पाटील, पुरवठा निरीक्षक स्मिता दत्तात्रय जोशी, रोहिणी शशांक गुप्ते यांनी गव्हाची पाहणी केली.