शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओपन कॅँटीन होणार इतिहास जमा

By admin | Updated: October 13, 2016 02:41 IST

केवळ विद्यार्थी, प्राध्यापकच नाही, तर पुण्यातील शिक्षण, कला, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील नागरिकांशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओपन कँटीनने

पुणे : केवळ विद्यार्थी, प्राध्यापकच नाही, तर पुण्यातील शिक्षण, कला, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील नागरिकांशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओपन कँटीनने एक वेगळीच ‘अ‍ॅटॅचमेंट’ निर्माण केली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने ओपन कँटीन बंद करून या जागेचा विकास करून बंदिस्त स्वरूपातील उपाहारगृह उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठाच्या खेर वाङ्मय भवन व मुलींच्या वसतिगृहाजवळ अनेक वर्षांपासून ओपन कँटीन सुरू होती. गेल्या काही वर्षांपासून एक कंत्राटदार ही कँटीन चालवत होता. विद्यापीठाच्या हिरव्यागार नयनरम्य वातावरणात मोकळ्या जागी चहा आणि नाष्टा करण्याचा एक वेगळाच आनंद ओपन कँटीनमधून अनेकांनी घेतला. विद्यापीठाच्या आवारात सकाळी व्यायाम करण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व तरुण आवर्जुन या कँटीनमध्ये चहा घेत मित्रांबरोबर गप्पा मारत असत. विद्यार्थी व प्राध्यापकही मोकळ्या जागी तासन्तास बसून शिक्षण व संशोधनविषयक चर्चा करत असत. ओपन कँटीनचा मूळ कंत्राटदारही तांबडे भोपळे, दुधी भोपळे, रंगीबेरंगी फुलांच्या झाडांनी ओपन कॅँटीन सजवत होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ओपन कँटीनची दुरवस्था झाली होती. विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांकडून कँटीनविषयीच्या अनेक तक्रारी विद्यापीठ प्रशानाला प्राप्त झाल्या होत्या.विद्यापीठाने निश्चित केलेल्या खाद्यपदार्थांच्या दरापेक्षा अधिक दर ओपन कँटीनमधील कर्मचारी वसूल करत होते. कँटीन चालकाकडून कोणालाही पिण्यासाठी साधे पाणीही दिले जात नव्हते. कँटीनच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता होती. त्यातच कँटीन चालकाचे विद्यापीठाशी असलेल्या कराराची मुदत संपल्याने विद्यापीठाने ओपन कँटीन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १० ते १५ दिवसांपासून ही कँटीन बंद आहे. आता याच जागेवर बांधकाम करून बंदिस्थ स्वरूपातील उपाहारगृह उभारले जाणार आहे. कँटीन बंद झाल्याने वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यावर पर्यायीव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशानाकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)