शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभाव जपणे हीच खरी श्रीमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:34 IST

समाजात वावरताना आपण समाजाकडून खूप काही घेत असतो. पण आता घेण्याची वेळ संपली असून देण्याची वेळ आली आहे, असा सेवाभाव निर्माण झाला पाहिजे.

पुणे : समाजात वावरताना आपण समाजाकडून खूप काही घेत असतो. पण आता घेण्याची वेळ संपली असून देण्याची वेळ आली आहे, असा सेवाभाव निर्माण झाला पाहिजे. हा भावच खरी श्रीमंती असूून, समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील श्री मुकुंददास लोहिया नेत्रालय आणि विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा बाह्यरुग्ण विभागाचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रशांत जगताप, मुकुंददास लोहिया, व्यवस्थापकीय विश्वस्त देविचंद जैन, सहव्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया, संचालिका डॉ. जे.रवींद्रनाथ आदी उपस्थित होते. श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या देणगीतून हे नेत्रालय उभारण्यात आले आहे. कार्यक्रमात सरकारला दुष्काळग्रस्तांकरिता २१ लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन ट्रस्टतर्फे देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात वय वर्षे ५५च्या पुढील लोक मोतिबिंदूने ग्रासलेले असतात. कोणतीही उपचाराची सुविधा नसल्याने आता हा आजार भोगायचा, ही मानसिकता त्यांच्यामध्ये तयार होते. शासन त्यांच्याकरिता विविध शिबिरे आणि जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून काम करीत आहे. परंतु मुकुंददास लोहिया नेत्रालयाच्या माध्यमातून देखील पुण्यासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सेवा पुरविली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बापट म्हणाले, पैसा हा केंद्रबिंदू न ठेवता आरोग्यसेवा हा केंद्रबिंदू ठेवून हॉस्पिटलचे विश्वस्त मंडळ काम करीत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करते. परंतु त्याला समाजातील दानशूर व्यक्तींच्या कार्याची जोड आवश्यक आहे, असे प्रशांत जगताप यांनी नमूद केले. चोरडिया यांनी प्रास्ताविकामध्ये नेत्रालयातील अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली. विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया यांनी आभार मानले.