शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग जपला तरच आपले अस्तित्व राहील : रघुनाथ ढोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे ५०५० रोपांचे वाटप करण्याचा निर्धार जैन सोशल ग्रुप पुणे परिवारातर्फे करण्यात आला आहे. ...

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे ५०५० रोपांचे वाटप करण्याचा निर्धार जैन सोशल ग्रुप पुणे परिवारातर्फे करण्यात आला आहे. त्या उपक्रमाचे उद‌्घाटन रविवारी सकाळी ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे ढोले, निसर्गप्रेमी श्रीकिशन काळे तर उपक्रमाचे समन्वयक युवराज शहा, रूपल शहा, राजेश जैन आदी उपस्थित होते. या वेळी सेल्फी विथ ट्री नावाचे सेक्शनही तयार करण्यात आले होते. त्यामध्ये उपस्थित नागरिकांनी सेल्फी काढले आणि त्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.

ढोले म्हणाले, ‘‘कोरोनामुळे नागरिक निसर्गाच्या जवळ आले आहेत. त्यांना आता निसर्गाचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे वृक्षारोपणाला वेग आला आहे. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर ते रोप मोठे होईपर्यंत त्याची निगा राखली पाहिजे. आपण घराचा प्रपंच करतो, तसेच वृक्षांना वाढविणे, त्यांचे संगोपन करण्याचा प्रपंचही करणे गरजेचे आहे. कारण आपण जो श्वास घेतो, तो या वृक्षांपासूनच मिळतो. त्यांना जपले तरच आपण जगू.’’