शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दीड किलोमीटरसाठी रखडली मेट्रो

By admin | Updated: January 3, 2017 06:34 IST

मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते रामवाडी या मार्गावरून जाणारी मेट्रो पहिल्या आराखड्यानुसार जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होती

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते रामवाडी या मार्गावरून जाणारी मेट्रो पहिल्या आराखड्यानुसार जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होती, मात्र या रस्त्यावरून मेट्रो नेण्यास विरोध झाल्याने ती दीड वर्षे रखडली. अखेर मार्गात बदल करून जंगली महाराज रस्त्याऐवजी ती नदीपात्रातून नेण्यात आली. मात्र नदीपात्रातून मेट्रो नेण्यास हरित न्यायाधीकरणाने अंतरिम स्थगिती दिली आहे. एकंदरीत या दीड किमीच्या मार्गाने मेट्रो प्रकल्पात अनेक अडथळे निर्माण केले आहेत.पुणे मेट्रो प्रकल्पाचा आराखडा दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या वतीने २००९ मध्ये पूर्ण करण्यात आला. वनाझ ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट या ३२ किमीच्या दोन मार्गांवरून मेट्रो धावणार आहे. या पहिल्या आराखड्यानुसार वनाझ ते रामवाडी मार्गावरची मेट्रो ही जंगली महाराज रस्त्यावरून धावणार होती. मेट्रोसाठी जंगली महाराज रस्त्यावरील काही जणांच्या जागा संपादित कराव्या लागणार होत्या, त्यामुळे याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. मेट्रोच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही दिल्लीदरबारी ती रखडली गेली. मेट्रो भुयारी असावी की एलिव्हेटेड यावरूनही वाद झाला. मेट्रोसाठी जागा जाऊ नयेत, यासाठी ती भुयारीच असावी, असाही आग्रह धरला गेला. जंगली महाराज रस्त्यामुळे मेट्रो रखडत असल्याने अखेर त्यामध्ये बदल करून ती नदीपात्रातून वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आराखड्यात बदल करून डेक्कन ते डेंगळे पूल असा १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून दाखविण्यात आला. नदीपात्रातून मेट्रो नेण्याच्या या निर्णयावर पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप घेतला. याविरोधात त्यांनी हरित न्यायाधीकरणामध्ये याचिका दाखल केली. नदीपात्रात ब्ल्यू लाइनच्या आत बांधकाम करण्यास मनाई आहे. नदीपात्रातील मेट्रोच्या बांधकामामुळे पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे, असे म्हणणे पर्यावरणवाद्यांच्या वतीने याचिकेत मांडण्यात आले आहे. यावर २५ जानेवारीपर्यंत नदीपात्रातील बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे.