शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूच्या ७० टक्के इजा हेल्मेट न वापरामुळेच

By admin | Updated: February 7, 2016 04:05 IST

शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी

पुणे : शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील मेंदूविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या अशा गंभीर रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहे.हेल्मेटसक्तीवरून सध्या शहरात मोठे वादळ उठले आहे. पण हेल्मेट न वापरता अपघात झाल्यास डोक्याला मार लागून जीव जाण्याची वेळही येऊ शकते, याकडे मात्र विरोधक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.याबाबत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. सुजित जगताप म्हणाले, की शहरात आणि प्रामुख्याने हायवेवर दुचाकीचे जे अपघात होतात त्यातील बहुतांशी नागरिकांना डोक्याला मार लागतो. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून अनेक गंभीर गोष्टी होऊ शकतात. डोक्याला नुसता मुका मार लागला तरी आत रक्तस्राव होऊ शकतो, सूज येऊ शकते आणि ती रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. माझ्याकडे अपघातात डोक्याला लागलेले अनेक रुग्ण येतात. त्यापैकी सुमारे ८० ते ९० टक्के रुग्णांनी हेल्मेटच वापरलेले नसते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश भंडारी म्हणाले, की अनेकदा आपण ऐकतो की एखाद्याचा अपघात झाला, त्याच्या शरीराला काहीच झाले नाही, पण डोक्याला मार लागला आणि त्याला अर्धांगवायू झाला, रक्तवाहिन्या फुटल्या, रक्तस्राव झाला, हे खरे आहे. शहरात जे अपघात होतात, त्यात डोक्यावर दुचाकीस्वार पडला आणि त्याने हेल्मेट घातलेले नव्हते, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. खोपडी फुटली तरच गंभीर इजा होते असे नाही. तर पडताना डोक्याला जोराने हादरा बसला, मेंदू हालला, छोट्या मेंदूला मार लागला तरी ते जिवावर बेतू शकते. यामुळे रक्तवाहिन्या फाटू शकतात. आमच्याकडे अशी अपघात झालेल्या येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांशी रुग्ण हे तरुण असतात.हेल्मेट वापराचे असेही फायदेहेल्मेट वापरामुळे डोक्याची सुरक्षा होते. त्याचबरोबर प्रदूषणयुक्त हवा कमी प्रमाणात शरीरात जाते, डोळयांचे वारा आणि धुरापासून संरक्षण होते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्या हेल्मेट वापरामुळे दुचाकीवरून जाताना कानांना वारा लागत नाही आणि मायग्रेनचा त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. सुजित जगताप यांनी दिली.