शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये रोजगार हमीची केवळ १९ कामे

By admin | Updated: April 24, 2017 04:36 IST

शासकीय रोजगार हमी योजनेपेक्षा खासगी शेतकऱ्यांच्या रानात मिळणारा रोजगार जादा असल्याने तालुक्यात सहा हजारांहून

इंदापूर : शासकीय रोजगार हमी योजनेपेक्षा खासगी शेतकऱ्यांच्या रानात मिळणारा रोजगार जादा असल्याने तालुक्यात सहा हजारांहून जास्त मजुरांची नोंदणी असताना व रोजगार हमीमधून २ हजार ८१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्षात १९ कामे सुरू आहेत. त्या कामांवर केवळ १०७ मजूर काम करत असल्याचे चित्र आहे.शासकीय रोजगार हमीची कामे कमी कालावधीची असतात. शेतकऱ्याकडे मिळणाऱ्या रोजगाराच्या तुलनेत मिळणारा रोजगार हमीची मजुरी कमी आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांकडे मजुरांचा ओढा नाही. रोजगार हमी योजनेतून कामे व्हावीत. मजुरांना रोजगार मिळण्यासाठी ती नेहेमीपेक्षा जास्त कालावधीची असावीत अशी मजुरांची अपेक्षा आहे. या करिता ग्रामसभांमध्ये या कामांची मागणी व ठराव होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेचा यथोचित उपयोग करणे महत्त्वाचे ठरणार आहे.(वार्ताहर) १ मे रोजी ग्रामपंचायतींनी ठराव घ्यावेत : गटविकास अधिकारीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत सन २०१७-१८ यावर्षीसाठी इंदापूर तालुक्यात ५ हजार १३२ कामांसाठी अंदाजपत्रकीय १० कोटी ७७ लाख ३० हजार ५३७ रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अकरा कलमी कार्यक्रमाचे नियोजन असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, सहायक कार्यक्रम अधिकारी नारायण खाडे यांनी सांगितले.यामध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, अंकुर रोपवाटिका, निर्मल शौचालये, निर्मल शोषखड्डे, कल्पवृक्षफळबाग लागवड, भूसंजीवनी नापेड कंपोस्टिंग, भू-संजीवनी कर्मी कंपोस्टिंग, समृद्ध गाव तलाव योजना व नंदनवन वृक्ष लागवड आदी कामांचा अंतर्भाव आहे. ४ लाख ५३ हजार १६५ मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ४सध्या विहीर, फळबाग लागवड, घरकुल, वृक्षसंवर्धन अशी १९ कामे सुरु आहेत. १०७ मजूर काम करत आहेत.प्रत्येकग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नावनिहाय, कामनिहाय कामे मंजूर करुन घेतली पाहिजेत. मंजूर काम करणाऱ्या लाभार्थ्यांकडे जॉबकार्ड आवश्यक आहे. ग्रामसभेत निवड केलेल्या कामांचा कृती आराखडा प्रत्येक वर्षी पंचायत समितीकडे पाठविणे गरजेचे आहे.