शिबिरात दररोज तंदुरुस्ती प्रशिक्षण देण्यात येणार असून यामध्ये अनेक नामांकित खेळाडू व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर क्रीडा मानसशास्त्र व क्रीडा आहार तज्ज्ञ हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे आयोजन राष्ट्रीय खेळाडू नरेश शेडगे, जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य भरत शिळीमकर, प्रशिक्षक पप्पू कंधारे, आकांक्षा देशमुख, एनएसआय प्रशिक्षक हर्षल निकम यांनी केले आहे. प्रशिक्षण शिबिराची वेळ संध्याकाळी चार ते पाच अशी राहणार असून झूम ॲपवर कार्यक्रम होणार आहे. सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी नुकतेच या शिबिराचे ऑनलाईन उद्घाटन केले. ते म्हणाले की, हा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रत्येक पालकाला वाटते आपला मुलगा खेळासाठी सुदृढ व्हावा आपल्या मुलाला खेळासाठी व्यासपीठ मिळावे. ऑनलाईन उपक्रमामुळे खेळाडूंना लॉकडाऊनमध्ये सराव करता येणार आहे.
कबड्डीपटूंसाठी ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST