शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन ‘पिफ’ला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:11 IST

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने १९वा ऑनलाइन ‘पिफ’ २५ मार्चपर्यंत रंगणार आहे. महोत्सवात जगातील उत्तम २६ ...

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने १९वा ऑनलाइन ‘पिफ’ २५ मार्चपर्यंत रंगणार आहे. महोत्सवात जगातील उत्तम २६ चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ‘लैला इन हैफा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. या चित्रपटाची लिंक आठ तासांसाठी खुली होती. याप्रमाणे प्रत्येक चित्रपट सादरीकरणाच्या वेळेपासून आठ तासांत कधीही पाहता येणार आहे. चित्रपट पाहणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा वाॅटरमार्क दिसत असल्याने चित्रपटाचे छायाचित्रण, तसेच स्क्रीनशॉट घेता येणे शक्य नाही. प्रेक्षकांना एका वेळी एकाच डिव्हाइसवर लॉगइन करता येणार आहे. दिवसात चार चित्रपट अपलोड केले जाणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने चित्रपट दाखवताना पायरसी टाळण्यासाठी कान, बर्लिन, व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय महोत्सवात वापरण्यात आलेल्या न्यूझीलंड येथील ‘शिफ्ट ७२’ या ऑनलाइन प्रणालीचा ‘पिफ’च्या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच वापर होत आहे. यामध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरच्या साह्याने चित्रपट जतन किंवा चित्रण करणे शक्य होणार नाही. नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी www.piffindia.com या वेबसाइटवर माहिती उपलब्ध आहे.