शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आॅनलाईन फॉर्म विक्री अजूनही आॅफलाईन

By admin | Updated: June 13, 2015 04:32 IST

आदिवासी विकास विभागाने वसतिगृहात प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरून प्रवेश घेण्याची प्रक्रिया यावर्षीपासून सुरू केली आहे.

घोडेगाव : आदिवासी विकास विभागाने वसतिगृहात प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरून प्रवेश घेण्याची प्रक्रिया यावर्षीपासून सुरू केली आहे. मात्र अजूनही फॉर्म भरण्याची साईट आॅफ लाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे. आंबेगाव तालुक्यात घोडेगाव, मंचर, शिनोली येथे आदिवासी मुला-मुलींची वसतिगृहे आहेत. येथील वसतिगृहांसाठी नवीन इमारती बांधण्यात आल्या असल्यामुळे येथे प्रवेशासाठी जास्त मागणी आहे. मागील वर्षी आदिवासी विकास विभागाने मंजूर विद्यार्थिसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली होती. मात्र यावर्षी जादा प्रवेश दिले जाणार नसल्याचे आदिवासी विकास विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार नाही. तसेच बाहेरच्या तालुक्यातील मुले मंचर, घोडेगाव येथील वसतिगृहांमध्ये प्रवेश मागतात. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाहीत. यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या बाहेरच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आंबेगाव तालुक्यातील वसतिगृहांमध्ये प्रवेश द्या; मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तालुक्यातील वसतिगृहात प्रवेश द्यावा तसेच साईट त्वरित सुरू करावी अथवा जुन्या पद्धतीने फॉर्म भरून घ्यावेत अशी मागणी पिंपरगणे गावचे उपसरपंच व युवकनेते भीमा गवारी यांनी केली आहे. (वार्ताहर)