शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन जमा झाले १५५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 01:43 IST

करदात्या नागरिकांना कर जमा करण्यासाठी पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात यावे लागूच नये, यासाठी आॅनलाइन पेमेंटच्या विविध सुविधा देण्यात मिळकत कर विभागाने आघाडी घेतली आहे.

पुणे : करदात्या नागरिकांना कर जमा करण्यासाठी पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात यावे लागूच नये, यासाठी आॅनलाइन पेमेंटच्या विविध सुविधा देण्यात मिळकत कर विभागाने आघाडी घेतली आहे. ८ लाख ५० हजारांपैकी सुमारे ६ लाख करदात्या नागरिकांनी आतापर्यंत पालिकेत कर जमा केला असून, त्यातील तब्बल १ लाख ८४ हजार नागरिकांनी आॅनलाइन पेमेंट केले आहे.या वर्षी आॅनलाइन पेमेंटद्वारे आतापर्यंत पालिकेकडे १५५ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षी एकूण जमा रकमेच्या फक्त १६ टक्के रक्कम आॅनलाइन पेमेंटद्वारे आली होती. या वर्षी मात्र एकूण जमा रकमेच्या ३२ टक्के रक्कम यापद्धतीने जमा झाली आहे. एक व्यक्ती पालिकेच्या कार्यालयात कर जमा करण्यासाठी आली की पालिकेला त्याच्या पावतीसह साधारण ५० रुपये खर्च त्यासाठी होतो. १ लाख ८४ हजार व्यक्तींनी आॅनलाइन पेमेंट केल्यामुळे पालिकेची त्यासाठी येणाऱ्या सुमारे ९० लाख रुपये खर्चाची बचत झाली आहे. त्यामुळेच पालिका आता याचपद्धतीने पेमेंट व्हावे यासाठी विविध उपाययोजना करीत आहे.या विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. इन्स्टापेमेंट अशी नवी संकल्पना सध्या सुरू करण्यात आली आहे. यात एकूण ६७ बँकांचा समावेश आहे. या बँकांबरोबर कनेक्ट असणाऱ्यांना या पद्धतीद्वारे पालिकेला त्यांचा मिळकत कर जमा करता येईल. बँकांनाही त्यांच्या ग्राहकांना विविध सुविधा द्यायच्या असल्याने यात पालिका, संबंधित बँका व मालमत्ताधारक अशा तिघांचाही फायदा आहे. याशिवाय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा विविध प्रकारच्या १५ पेक्षा जास्त पद्धतीनेही मालमत्ताधारकांना त्यांचे पेमेंट करता येणार आहे.(प्रतिनिधी)