शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ तपासणार आॅनलाइन उत्तरपत्रिका

By admin | Updated: November 25, 2015 01:14 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या तब्बल १२ हजार ५०० उत्तरपत्रिका यंदा आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या तब्बल १२ हजार ५०० उत्तरपत्रिका यंदा आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल अभ्यासक्रमांचा समावेश आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले. चव्हाण म्हणाले की, विद्यापीठांतर्गत गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर काही विषयांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासण्यात आल्या होत्या. त्यात कोणताही अडथळा आला नाही. त्यामुळे यंदाच्या अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २५ ते ५० संगणक, स्कॅनरची स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यामुळे कमी कालावधीत उत्तरपत्रिका तपासून होतील. विद्यार्थ्यांना या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने पाहता येतील. पुढील काळात सर्व विद्याशाखांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)