शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन प्रवेश प्रकिया आजपासून

By admin | Updated: May 31, 2017 03:08 IST

बारावीचा निकाल जाहीर होताच शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. काही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बारावीचा निकाल जाहीर होताच शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. काही महाविद्यालयांनी मात्र विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना आता वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयातील विज्ञान व कला शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी बुधवारपासून आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्यांना आॅनलाइन अर्जाची प्रिंटआऊट काढून त्याला गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रे जोडून ती कागदपत्रे महाविद्यालयात जमा करावी लागणार आहेत. बीएमसीसी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्षाची  प्रवेश प्रक्रियाही याच पद्धतीने पार पडणार आहे. प्रवेशाची अधिक माहिती फर्ग्युसन व बीएमसीसी महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.संकेतस्थळावर अर्ज1स.प. महाविद्यालयाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशाची आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर ९ जून रोजी प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, अशी माहिती स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप सेठ यांनी दिली.2गरवारे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर ९ जूननंतरच सुरू केली जाणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना गुणपत्रिका स्कॅन करून अपलोड करावी लागेल, अशी माहिती गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्या मुक्तजा मठकरी यांनी दिली. 3मॉडर्न महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे अर्ज संकेतस्थळावर बुधवारपासून आॅनलाइन उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्यांना आॅनलाइन अर्जात भरलेली गुणांची माहिती व गुणपत्रिका यांची महाविद्यालयातून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे, अशी माहिती मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव यांनी दिली.