शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

‘आयटीआय’ आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा

By admin | Updated: July 5, 2014 06:04 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा झाला आहे.

पुणे : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या आॅनलाइन प्रवेशाचा खोळंबा झाला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध झाले नसून शनिवारपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने मागील वर्षीपासून राज्यातील शासकीय ‘आयटीआय’मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यातील सुमारे ९९ हजार जागांवरील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे. संचालनालयाने मागील आठवड्यात ही प्रक्रिया ५ जुलैपासून सुरू होईल, असे संकेतस्थळावर जाहीर केले. तसेच, प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक ३ जुलै रोजी प्रसिद्ध केले जाईल, असेही त्या वेळी स्पष्ट केले होते. मात्र, ३ तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध झाले नसल्याने विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी ‘आयटीआय’ला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. या संदर्भात संचालनालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध करता आलेले नाही. शनिवारी हे वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, शनिवारपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. कदाचित ही प्रक्रिया एक-दोन दिवस उशिराने सुरू होईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)