शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर सांगूनही कांदा विकला जाईना...

By admin | Updated: December 25, 2016 04:43 IST

वर्षभर कांद्याचे बाजारभाव कमीच राहिल्याने आंबेगाव तालुक्यात यावर्षी कांद्याचे बी व रोपे यांना अपेक्षित मागणी नाही. विक्रीला फटका बसल्याने शेतकऱ्यांनी रोपविक्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या

मंचर : वर्षभर कांद्याचे बाजारभाव कमीच राहिल्याने आंबेगाव तालुक्यात यावर्षी कांद्याचे बी व रोपे यांना अपेक्षित मागणी नाही. विक्रीला फटका बसल्याने शेतकऱ्यांनी रोपविक्रीसाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. परंतु तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने आता रोपे अक्षरश: फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. कांदा पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. कांदा पिकाला वर्षभर बाजारभाव नाही. भांडवल शेतकऱ्यांच्या अंगावर आले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा बराखीत सडू लागला आहे. कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याने यावर्षी कांदा लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने घरी कांदा बी टाकून रोपे तयार करतो. मागील काही वर्षांपासून कांदा रोप तयार करून ते विकण्याचा व्यवसाय शेतकरी करत आहेत. त्यातून चांगला नफा शिल्लक राहतो. ४० ते ४५ दिवसांत हे रोप तयार झाल्यावर त्याची लागवड केली जाते. वातावरण चांगले असल्याने रोपाची उगवण चांगली झाली आहे. शेतकऱ्यांनी अगोदरच रोपे टाकल्याने रोपे जास्त, मागणी मात्र कमी, असा प्रकार घडला आहे. वर्षभर कांद्याला बाजारभाव नाही, तसाच तो इतर तरकारी मालाला नाही. त्यामुळे कांदा लागवडीचा बेत अनेक शेतकऱ्यांनीरद्द केला आहे; त्याऐवजी गहू अथवा इतर पिकांकडे तो वळला आहे. काही शेतकरी रोपांची लागवड करताहेत. मात्र विकतचे रोप घेण्यास कोणीच तयार नाही. कांदा लागवड सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.चिंचोडी येथील शेतकरी राजेंद्र शेवाळे यांनी कांदा रोप विक्रीसाठी काढले. मात्र त्यांना ग्राहकच मिळाले नाही. शेतकरी कांदा लागवड कमी करतात. त्यामुळे मागणीच नाही. शेवाळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला; मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. शेवटी कांदा रोप मोठे झाल्यावर उपटून फेकून देण्याची वेळ येणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.