शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे कांदा, गव्हाला धोका; शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:32 IST

बुधवारपासून असलेले ढगाळ वातावरण अजून निवळलेले नसून मोठा पाऊस होतो की काय, या धास्तीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे काढणीसाठी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, आंबा ही पिके धोक्यात आली आहेत.

घोडेगाव : बुधवारपासून असलेले ढगाळ वातावरण अजून निवळलेले नसून मोठा पाऊस होतो की काय, या धास्तीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे काढणीसाठी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, आंबा ही पिके धोक्यात आली आहेत.सध्या कांदा व गहू ही पिके काढणीला आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात करपू शकते व मावा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जमिनीत कांदा वाढत नाही व उत्पादनात घट होते. अगोदरच कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी चिंचेत आहे व त्यात अशा वातावरणामुळे अजून नुकसान होणार आहे. तसेच काढणीसाठी आलेला गहू पावसामुळे जमिनीवर पडून खराब होऊ शकतो. आंब्याला या वातावरणाचा फटका बसणार आहे. मोहरातून निघालेली कनी या ढगाळ वातावरणामुळे गळून जाऊ लागली आहे. तसेच थोड्या मोठ्या झालेल्या फळावर पावसाचा थेंब पडल्याने हे फळ खराब होणार आहे. तसेच सध्या द्राक्षाला ३५ ते ४० रुपये असा बाजारभाव मिळत असला तरी अचानक पडलेल्या पावसामुळे काढणीला आलेली द्राक्ष खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.वातावरणातील सततच्या बदलामुळे जशी माणसे आजारी पडतात तशीच अवस्था पिकांची झाली आहे. काही दिवस कडक ऊन तर मध्यच थंडी व ढगाळ वातावरण, शेतमाल कसा पिकवावा असा प्रश्न पडला आहे.या ढगाळ वातावरणाचा कांदा,गहू, आंबा या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शिनोलीयेथील शेतकरी मधुआप्पाबोºहाडे यांनी व्यक्त केली.