जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व आक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत होती. जिल्ह्यात लोकसंख्येच्या मानाने वेल्हे तालुका छोटा असला तरी कोरोना रुग्णांची
संख्या अधिक असल्याने कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तपासणी दर जिल्ह्यापेक्षा चार पटीने अधिक करत एका व्यक्तीच्या पाठीमागे चाळीस ते पंचेचाळीस रुग्णांची तपासणी केली गेली. तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनीधींच्या समन्वयातुन एकत्रीत येवुन योग्य
नियोजनाने कोरोनावर मात केल्याने डिसेंबर २०२० साली जिल्ह्यातील वेल्हे तालुका हा पहिला कोरोनामुक्त तालुका झाला होता. तर ८ मार्च २०२१ रोजी
अखेर तालुक्यात फक्त ३ पेशंट आहेत.
वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील अंगणवाडी सेविका ही महिला जिल्ह्यातील पहिली रूग्ण ठरली होती. त्या पुण्यात वास्तव्यास होत्या तर वेल्हे तालुक्यात नियमित प्रवास करीत होत्या. त्या पॉझिटीव्ह आढळल्याने ९६ व्यक्तींना शिक्के मारुन गृह विलगीकरण करुन वैद्यकीय निगरानी
खाली ठेवले होते. तसेच या परिसराकडे लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाकडुन सुरु झाले होते. यावेळी जिल्हा स्तरावरील २७ पथके वेल्हे तालुक्यात दाखल होऊन
तालुक्यातील संपुर्ण गावातील व्यक्तींची तपासणी करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. त्यानंतर तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत गेला. तालुक्यातील
निगडेमोसे, वडगाव झांजे, वांजळे,वेल्हे बुद्रुक, ओसाडे, पानशेत, रुळे, अंत्रोली, अंबवणे, दापोडे, करंजावणे, खांबवडी, कोंढावळे खुर्द, कोळवडी, मार्गासनी, पाबे
निवी, विंझर या गांवामध्ये कोरोना रुग्णांचा प्रभाव जास्त होता.
वेल्हे तालुक्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे.
१) एका वर्षांच्या कालावधीमध्ये तालुक्यातील ५००० च्या आसपास नागरीकांची कोरोनाची तपासनी करण्यात आली होती.
२) ६८२ जण कोरोना पॉझिटीव्ह आले होते.
३) २२ जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.
४) ६५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
५) ०३ जण सध्या अॅक्टीव्ह रुग्ण आहे.
महिन्यानुसार रूग्णांची आकडेवारी
मार्च-०,
एप्रिल-०८,
मे- २५,
जुन- २१, जुलै - ११८, ऑगस्ट-११९,
सप्टेंबर-२४८,
ऑक्टेाबर-८८,
नोव्हेंबर-२९, डिसेंबर -०, जानेवारी २०२१-०५
फेब्रुवारी--१८,
८ मार्च २०२१-०३.
तालुक्यात सुरू असलेल्या उपाय योजना
कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासनी जिल्ह्यात सर्वात जास्त वेल्ह्यात केली गेली ती सरासरी ४० ते ४५ टक्के एवढी होती. तालुक्याबाहरुन व नियमित प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष व त्यांची तपासणी नियमीत सुरू आहे. तालुक्यातील खासगी डॅाक्टरांशी समन्वय साधुन लक्षणे आढळलेल्या रुग्णांची तपासणी. तालुक्यात येणारे सर्व नाके मार्ग बंद करत पोलीस व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने १८ ठिकाणी नाकेबंदी.
-तालुक्यातील नागरीकाची अन्नधान्यची गैरसोय होवु नये म्हणुन जिल्ह्यात पहिली धान्यबॅंक वेल्हे तहसिल कार्यालयात सुरु व ग्रामदुत संकल्पना
मुळची वेल्हे तालुक्याचीच.
-जीवनावश्यक वस्तुंची खरेदी विक्री करीता तालुकाबाहेर प्रवास करणाऱ्यांना व बाहेरुन येणाऱ्या नागरीकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन
- तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातुन गावात निर्जंतुकीकरणासाठी औषधाची फवारणी ,घरोघरी सॅनिटायझर मास्कचे मोफत वाटप
- माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासनी सर्वेक्षण.
- ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन कोरोनाबाबतचे नियम न पाळणारावर दंडात्मक कारवाई
- ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन तालुक्याला एक रुग्णवाहीका खरेदी केली.