शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

चिंचवडमध्ये एक गाव एक शिवजयंती

By admin | Updated: March 16, 2017 01:46 IST

महान साधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवडमध्ये शिवछत्रपतींचा जन्मोत्सव आनंदात पार पडला. काळभैरवनाथ उत्सव समिती

चिंचवड : महान साधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवडमध्ये शिवछत्रपतींचा जन्मोत्सव आनंदात पार पडला. काळभैरवनाथ उत्सव समिती आयोजित अखिल चिंचवडगाव शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात शिवव्याख्यात्यांनी इतिहासाची ओळख करून देणारे मार्गदर्शन केले. चिंचवडमधील विविध मंडळे, संस्था,व्यापारी,सामाजिक व राजकीय मंडळींना बरोबर घेत एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम राबविला.रवींद्र यादव यांनी अपरिचित शिवराय, हभप मंगला कांबळे यांनी हिंदू धर्म संस्कार ,सचिन ढोबळे यांनी छत्रपतींचे शिवचातुर्य,मोहन शेटे यांनी जाणता राजा,प्रसाद मोरे यांनी छत्रपतींचे युद्धतंत्र, शरद पोंक्षे यांनी छत्रपती शिवराय आणि राजकारण व सौरभ कर्डे यांनी छत्रपती शिवराय आणि कविभूषण या विषयी व्याख्यान दिले.श्री काळभैरवनाथ मंदिर येथे शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सायंकाळी चापेकर चौकातून शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.ढोल-ताशाचा गजर आणि छत्रपतींचा जयघोष करत हजारो शिवभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. चिंचवडगाव, काकडे पार्क, तानाजीनगरमार्गे पालखी सोहळा पुन्हा चापेकर चौकात आला.भगवे फेटे आणि हातात झेंडे घेतलेले अनेक मावळे लक्षवेधी ठरले.दळवीनगरातील समता तरुण मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व्याख्यान, पोवाडे व ढोल -ताशांचा गजर करत परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. विविध वेशभूषा करत मिरवणुकीत सहभागी झालेले बालचमू सर्वांचे आकर्षण ठरले.या मिरवणुकीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. फुलांची उधळण करीत कार्यकर्त्यांनी छत्रपतींचा जयघोष केला.यासाठी किरण दळवी, अविनाश दळवी, संतोष जाधव, धनंजय खराडे, आशिष पाटील, दिनेश मालुसरे,विजय दळवी, महेश एमबाडे, प्रदीप जाधव, सागर चव्हाण, संतोष दळवी, पप्पू मालुसरे यांनी योगदान दिले. (प्रतिनिधी)