शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणात एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वीच्या प्रेमसंबंधातून गोड बोलून तिचे बरेवाईट करण्याच्या हेतूने तरुणीचे अपहरण करणार्‍यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्वीच्या प्रेमसंबंधातून गोड बोलून तिचे बरेवाईट करण्याच्या हेतूने तरुणीचे अपहरण करणार्‍यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर गुंडव (रा. चांदुरबाजार, अमरावती) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिक बापूराव गेडाम (वय २४, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या ३० वर्षाच्या बहिणीचे १० वर्षापूर्वी आरोपीबरोबर प्रेमसंबंध होते. आरोपी वाईट चालीचा असल्याचे समजल्यावर तिने त्यांच्याशी संबंध तोडले. त्यामुळे गुंडव याने अमरावती येथील त्यांच्या घरी जाऊन तोडफोड व नासधुस केली होती. त्यानंतर फिर्यादीची बहिणी पुण्यात वडगाव शेरी येथील जय अपार्टमेंटमध्ये रहायला आली होती. सागर याने तिच्याशी गोड बोलून तिला १३ मार्च रोजी घेऊन गेला. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही. चंदननगर पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

अमरवती पोलिसांनी केलेल्या तपासात चांदूरबाजार येथे या तरुणीचा डबा व कपडे सापडले. मात्र, तिचा काहीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिच्या भावाच्या फिर्यादीनंतर चंदननगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोपटे यांनी सांगितले की, आरोपी सापडला असला तरी ही तरुणी न मिळाल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या आईवडिलांनी तक्रार दिल्याने चांदूरबाजार पोलिसांनी सागर गुंडवे याला अटक केली. त्याला येत्या २ दिवसात ताब्यात घेऊन अधिक तपास करण्यात येणार आहे.