शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एक चूक झाली अन् मी कानाला खडा लावला!

By admin | Updated: January 12, 2017 02:18 IST

पदाला हपापले असतात असे आयाराम-गयारामांचा कुठलाही सत्ताधारी पक्ष असला की तिकडे जातात.

पुणे : पदाला हपापले असतात असे आयाराम-गयारामांचा कुठलाही सत्ताधारी पक्ष असला की तिकडे जातात. आम्ही सत्तेत असताना अशीच एक चुक झाली..पण नंतर मात्र मी कानाला खडा लावला असे मत व्यक्त करताना सध्या काही पक्षांची कोणाला घेऊ, कोणाला नको अश्ी स्थिती असल्याने गुंडांचे प्रवेश होत असल्याचा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला. पोलिस आयुक्त, एस.पी ला एक फोन केला तर पक्षात येणाऱ्यांचे रेकॉर्ड पाच मिनिटांत उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुलाखती सुरु आहेत. या वेळी पवार पत्रकारांशी बोलत होते. मुळशी तालुक्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार यांचा नुकताच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यापार्श्वभूमीवर पवार म्हणाले,‘‘ सत्ताधारी कोणताही पक्ष असल्यावर त्या पक्षात प्रवेश करणा-यांचे प्रमाण अधिक असते. पदासाठी हापापलेले पक्षांतर करतात. निष्ठावान कार्यकर्ता असे कधीच करत नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारे गुंडाचे प्रवेश ही राजकारणाला लागलेली कीड आहे. भाजप सध्या सर्रास सर्वांना उमेदवारी देऊ सांगून पक्ष प्रवेश करून घेत आहे. परंतु उमेदवारी देताना निष्ठावंताना डावलून आयात व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अनेक अडचणी निर्माण होतात.’’ टाळी वाजवायला तयार, पण...!महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीत टाळी वाजवायला तयार आहेत, पण सध्या तरी त्यांना कोणीच हात द्यालया पुढे येत नाही. परिस्थिती बदलली की असे होणारच असा टोला देखील अजित पवार यांनी ठाकरे यांना लावला. आझम पानसरे प्रवेशाबाबत पिंपरीतच बोलणार ४पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आझम पानसरे यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, पानसरे प्रवेश हा काय राज्यस्तरावरील किंवा जिल्ह्याचा विषय नाही. पानसरे यांच्या प्रवेशाबाबत दोन दिवसात पिंपरी-चिंचवड मध्ये जाऊनच काय बोलायचे ते बोलेल असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.