शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड ट्रकच्या धडकेत एक ठार

By admin | Updated: February 16, 2017 02:59 IST

नादुरुस्त झालेल्या ओव्हरलोड ट्रकने अचानक उताराने ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक टाटाचा छोटा मालवाहू

कुरुळी : नादुरुस्त झालेल्या ओव्हरलोड ट्रकने अचानक उताराने ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक टाटाचा छोटा मालवाहू टेम्पो, एक दुचाकी व पानटपरीला धडक दिली. या अपघातात एक जण ठार झाला. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कुरुळी फाटा (ता. खेड) येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अब्दुल ऊर्फ ए. जे. मोमीन (वय ४८, सध्या रा. जय गणेश साम्राज्य, पांजरपोळ भोसरी, मूळ रा. बागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याप्रकरणी सविता मनोजकुमार टंडन (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रा पी. कुशवाहा (वय २५, रा. धुमनगंज अलाहाबाद, उत्तर प्रदेश) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी (ता. खेड) जवळील सोनवणेवस्ती येथे अवजड मालाने भरलेला ट्रक (यूपी ७० एटी ५१९९) अचानक रिव्हर्स येऊ लागला.महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या एका मोटारीला मागे येणाऱ्या या ट्रकने धडक दिली. त्यानंतर एका टाटा कंपनीच्या छोटा मालवाहू टेम्पोला धडक दिली. यानंतर ट्रकने होंडा सिटी मोटारीला (एमएच १४ ईपी ३३८८) धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या दुभाजकाला आदळून वेगात या ट्रकने रस्त्यालगत हवा भरण्यासाठी उभ्या असलेल्या मोटारीला (एमएच १४ सीसी ९५८२) धडक दिली. त्या वेळी या मोटारीचे मालक अब्दुल ऊर्फ ए. जे. मोमीन या ट्रकखाली चिरडले गेले. लगतच असलेल्या श्लोक पान स्टॉलवर हा ट्रक धडकल्यानंतर थांबला.