शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीत एकाचा मृत्यू ; आई, मुलास अटक

By admin | Updated: May 7, 2017 02:25 IST

किरकोळ कारणावरून जुन्नर येथील वरली आळी येथे शेजारी रहाणाऱ्या कुटुंबात झालेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : किरकोळ कारणावरून जुन्नर येथील वरली आळी येथे शेजारी रहाणाऱ्या कुटुंबात झालेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय सुरेश मुटके याचा पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी आई व मुलगा अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. मयत दत्तात्रय यांची पत्नी अनिता यांनी जुन्नर पोलिसात फिर्याद दिली होती.याबाबत घडलेली घटना अशी, जुन्नर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वरली आळी येथे शेजारी असणारे चिंचोले व मुटके कुटुंबातील मिना मुटके यांनी चिंचोले कुटुंबीयांचा मिक्सर सहा महिण्यापूर्वी वापरण्यास नेला होता. तो परत आणून न दिल्याने दत्तात्रय मुटके याने पत्नीला बडबड केली. यावरून दोन कुटुंबात किरकोळ भांडण झाले. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यात मार लागून जबर जखमी झालेले दतात्रेय मुटके यांना गंभीर दुखापत झाली. जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने पुण्यात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना गुरुवारी उशिरा रात्री मृत्यू झाला. त्यावरून जुन्नर पोलिसांनी मिना रघुनाथ चिंचवले व मुलगा नितिन चिंचवले दोघे (रा.वरली आळी, ता. जुन्नर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन मिना चिंचवले व तिचा मुलगा नितिन चिंचवले या दोघा आरोपींना अटक केली. अधिक तपास जुन्नर पोलीस निरीक्षक कैलास घोडके करीत आहेत.