शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

उरुळी देवाचीत गोळीबारात एक ठार

By admin | Updated: December 13, 2015 23:59 IST

परमिट रूममध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाने पिस्तुलातून गोळ्या झाडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

लोणी काळभोर : परमिट रूममध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाने पिस्तुलातून गोळ्या झाडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी मध्यरात्री पुणे-सासवड मार्गावरील उरुळी देवाची गावाच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली.विश्वास पुनाजी मोडक (वय ३४, रा. बाजारेमळा, वडकी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. यात दत्तात्रय बाळासाहेब आंबेकर (वय ३०, रा. वडकीनाला, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला आहे. दादासाहेब बबन मोडक (रा. वडकीनाला, ता. हवेली) यांच्या छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी आहेत. हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून छातीतील गोळी काढण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय बाबूराव शिंदे (वय ३०, सध्या रा. वज्रेश्वरीदेवी मंदिरामागे, उरुळी देवाची) याने गोळीबार केला आहे. तो फरार आहे. त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र मुक्तार इक्बाल शेख (वय ३३, हडपसर) व नितीन धर्मराज भालेकर (वय ३३, उरुळी देवाची) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.१२ डिसेंबरला दत्तात्रय आंबेकर, विश्वास मोडक व दादासाहेब मोडक जेवण करण्यासाठी ते हॉटेलमध्ये आले. या तिघांनी आत प्रवेश केला व तेथील व्यवस्थापकास जेवण देण्याची विनंती केली. त्याच्या अगोदर हॉटेलमध्ये अजय शिंदे, मुक्तार शेख व नितीन भालेकर हे तिघे मद्यपान करीत बसले होते. अजय शिंदे व व्यवस्थापक यांच्यात काही कारणास्तव वाद झाल्याने शिंदे याने ग्लास फोडला.हे तिघेही बाहेरगावचे असून, बिल देण्यावरून दादागिरी करतात. त्यावर दत्तात्रय आंबेकर त्यांच्यापाशी गेले व हॉटेलमध्ये दादागिरी का करता? असा जाब विचारला असता, त्या तिघांशी त्यांची बाचाबाची झाली. प्रकरण शांत झाल्यानंतर शिंदे, आंबेकर व शेख हे तिघेही निघून गेले. मध्यरात्री १.३० च्या सुमारास विश्वास, दादासाहेब व दत्तात्रय हे तिघे जेवण करीत असताना ते तिघे परत आले व त्या सहा जणांत पुन्हा बाचाबाची झाली. या वेळी शिंदे याने पिस्तूल काढले व त्यातील एक गोळी दादासाहेब मोडक यांच्या छातीवर झाडल्याने ते जखमी होऊन खाली कोसळले. हा प्रकार पाहून आंबेकर त्यास अडवण्यास पुढे झाले, त्या वेळी त्यांच्यावरही झाडलेली गोळी छातीत वर्मी बसल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यानंतर शिंदे याने विश्वास मोडक यांच्याकडे मोर्चा वळवला. संतोष डोगरे व व्यवस्थापक अण्णा शेट्टी हे मध्ये पडल्याने ते वाचले. घटनास्थळास जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक तान्हाजी चिखले, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर यांनी भेट दिली. पोलिसांनी मुक्तार शेख व नितीन भालेकर यांना ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्यांना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)