शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

खेड तालुक्यातील आरक्षण सोडतीला तासाचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या आरक्षण सोडत तहसीलदार सुचित्रा आमले यांनी टप्यानिहाय जाहिर केल्या. सात करस्थळ येथील ...

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या आरक्षण सोडत तहसीलदार सुचित्रा आमले यांनी टप्यानिहाय जाहिर केल्या. सात करस्थळ येथील खाडंगे लाँन्स मंगल कार्यालयात सरपंच पदाच्या आरक्षण सोडती तब्बल तीन तास चालल्या. भारत बंदमुळे अनेक इच्छुक कार्यकर्ते साडे अकरा नंतर कार्यालयात आल्यामुळे तब्बल एक तास उशिरा आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु करण्यात आला.

सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत शासनाकडून तालुक्यातील २१ गावे आदिवासी म्हणुन जाहिर केल्याने अनुसुचित जमातीच्या आरक्षण काढताना एकत्रित २१ गावांच्या चिठ्या टाकून यामधून ११ गावे महिलासाठी राखीव म्हणून चिठ्ठया काढण्यात आल्या. तर उर्वरीत १४१ गावांच्या गेल्या चार पंचवार्षिक मध्ये सरपंचाचे पडलेले आरक्षणाचा विचार करुन पुढील विविध जाती आरक्षणनिहाय गावांचे वर्गीकरण आरक्षण निश्चित करत अनुसूचित जाती,नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण या प्रमाणे सोडती घेऊन महिलांचे आरक्षण चिठ्या काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या प्रियांका लोखंडे या शालेय मुलीच्या हस्ते काढण्यात आल्या.

खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण पुढील प्रमाणे:

सर्वसाधारण

कान्हेवाडी तर्फे चाकण, खराबवाडी,वराळे, येलवाडी , सिध्देगव्हाण, साबळेवाडी,भोसे, केळगाव, धानोरे, चिबंळी, बोरदरा, संतोष नगर, शिंदे, वासुली,पाळु, तोरणे बु.,शिवे,देशमुखवाडी,गडद, औंढे, कुरकुंडी, कोरेगाव खुर्द, तिफणवाडी, कान्हेवाडी बु.,कोहिंडे बु., गारगोटवाडी, चास, मोहकल, चांडोली, खरपुडी बु., जऊळके बु, राक्षेवाडी, वरची भाबुंरवाडी, खालची भाबुंरवाडी, गोसासी, चिचबाईवाडी, वाकळवाडी, वरुडे,

सर्वसाधारण महिला

वेताळे, साबुर्डी, कमान, बुरसेवाडी ( बिबी ), वाशेरे, तळवडे, आखरवाडी, रानमळा, पापळवाडी, बहिरवाडी, मिरजेवाडी, पाडळी, सांडभोरवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी, जऊळुके खु., खरपुडी खु., पिपंरी बु., पुर, गाडकवाडी, निमगाव, दावडी, बहुळ, सोळु, च-होली खु., शेलगाव, भांबोली, आसखेड खु., आसखेड बु., धामणे, टेकवडी, हेद्रूज, वहागाव, कोळीये, आंबोली, औदर, चिखलगाव, कळमोडी, वाळद, किवळे, कोये.

नागरीकांचा मागास प्रवर्ग

येणिये बु., कडुस, दोंदे, सायगाव, गुळाणी , वाफगाव, चिंचोशी, रेटवडी, जैदवाडी, कोहिणकरवाडी, वाकी बु., सावरदरी,चांदुस, दौंडकरवाडी, वडगाव घेनंद, गोलेगाव,मरकळ,कोयाळी तर्फे चाकण, पिंपळगाव तर्फे खेड,

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

पाईट, वाडा, सुपे, आडगाव, अनावळे, अहिरे, रौधंळवाडी, वि-हाम, कुडे खु., येणिये खु.,कडधे, वडगाव पाटोळे, कडाचीवाडी,कुरुळी, निघोजे, म्हाळुंगे, रोहकल, शेलु.

बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसुचित जमाती

भोरगिरी, खरोशी, धुवोली, धामणगाव खु.,परसुल, खरपुड, घोटवडी, कुडे बु., वांद्रा, साकुर्डी, दरकवाडी, कोयाळी तर्फे वाडा, आंबेठाण, रासे, वाकी खु., सातकरस्थळ.

बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती महिला

खालुंब्रे, सांगुर्डी, कंरजविहिरे, कनेरसर, पागंरी, टोकावडे, डेहणे, नायफड, शिरगाव, भोमाळे, एकलहरे, शेंदुंर्ली, मोरोशी, आव्हाट, गोरेगाव, सुरकुंडी, देवोशी,वाघु.

अनुसूचित जाती

मेदनकरवाडी, बिरदवडी,शिरोली, वाजवणे,

अनुसुचित जाती महिला

नाणेकरवाडी, मोई, कोरेगाव बु., आंभु, होलेवाडी.