लोणावळा : सलग सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी सलग दुसºया दिवशीही झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहने महामार्ग पोलिसांनी लोणावळा एक्झिटजवळ रोखून धरली. एक - एक तासाच्या अंतराने रोखलेली वाहने सोडण्यात येत होती. या एक तासाच्या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांवरून सोडण्यात येणार असल्याचे महामार्गचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.या एक तासाच्या कालावधीत मुंबईकडून येणारी सर्व वाहने ही मुंबई व पुणे या दोन्ही मार्गिकांवरून लोणावळा दरम्यान सोडण्यात येत होती. याकरिता महामार्ग पोलिसांचा ताफा एक्स्प्रेस वेवर लोणावळा एक्झिटजवळ तैनात होता. लहान वाहने लोणावळ्यात सोडल्याने शहरातून जाणाºया जुन्या महामार्गावरही वाहतूककोंडी झाली होती.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एक-एक तासाचा ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 03:16 IST