शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी एकाला अटक

By admin | Updated: June 17, 2014 03:06 IST

घरभाड्याचे पैसे बुडविल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला

पिंपरी : घरभाड्याचे पैसे बुडविल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक केली आहे, तर सातजण फरार आहेत. ही घटना रविवारी पहाटे बिजलीनगर, चिंचवड येथील राजमाता सावित्रीबाई कॉम्प्लेक्स येथे घडली. राकेश विकास विसपुते (वय २४, रा. राजमाता सावित्रीबाई कॉम्प्लेक्स, बिजलीनगर, चिंचवड) यांच्यासह टेम्पोचालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी जीवन शिवाजी शेंडगे (वय २८, रा. साम्राज्य बंगला, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे, तर गणेश खांगटे (रा. बिजलीनगर, चिंचवड), शुभम सूर्यवंशी, अखिल शेख, गणेश शिंदे, योगेश फुरडे, समीर शेख, इरफान शेख हे फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाता सावित्रीबाई कॉम्प्लेक्स येथे विसपुते भाडेतत्त्वावर राहत होते. ते मळवली फाटा येथे भाड्याने दुसरी खोली घेऊन त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी आरोपी शुभम सूर्यवंशीने विसपुते यांना शिवीगाळ करीत ‘का रे, भाडे न देताच पळून चालला का’ असे म्हणत दमदाटी केली. तसेच फायबरच्या पाइपने पाठ, पोट व पायावर मारहाण केली. इतर आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या ठिकाणी असलेला टेम्पोचालक भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करीत टेम्पोचे नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी विसपुते यांना जवळच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर नेले. ‘भाड्याचे पैसे आत्ताच दे नाही, तर हात-पाय तोडू’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. खांगटे याने त्यांच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली, तर इतर आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल व रोकड असा ८५ हजारांचा ऐवज काढून घेतला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.(प्रतिनिधी)