शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी एकाला अटक

By admin | Updated: April 2, 2016 03:26 IST

२१ वर्षीय महाविद्यालयीन युवतीची छेडछाड करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या एका पोलीस मित्रावर नारायणगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून

नारायणगाव : २१ वर्षीय महाविद्यालयीन युवतीची छेडछाड करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या एका पोलीस मित्रावर नारायणगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला आज अटक केली.शाहीद अरूरमहम्मद इनामदार (रा़ नारायणगाव, मुक्ताई मंदिराशेजारी ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. हा तरुण काही महिन्यांपूर्वी नारायणगाव पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करीत होता़ २९ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास बसस्थानकात मैत्रिणींची वाट पाहात बसली होती़ इनामदार याने तिच्या समोर येऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले़ वेडेवाकडे हावभाव करून चहा पिण्यासाठी चल, असे म्हणून तिला प्रवृत्त करीत होता़ त्या युवतीने घाबरून मदतीसाठी आरडाओरडा केला़ नागरिकांनी शाहीद याला पकडून त्या युवतीला त्रास का देतो, असा जाब विचारला असता, शाहीद याने नागरिकांना अरेरावीची भाषा करीत पोलीस असल्याचे भासविले. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली़ त्या वेळी त्याने पोलीस माझे काहीच वाकडे करू शकत नाही, असे उत्तर दिल्याने नागरिकांनी इनामदार यास बसस्थानकात चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले़ शाहीद गेल्या काही दिवसांपासून या युवतीला एकटक बघणे, तिच्या मागे मागे जाणे, तिला इशारा करणे, हातवारे करणे असे प्रकार करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून व घाबरून तिने परीक्षा सुरू असतानाही परीक्षेला न जाता थेट पोलीस ठाण्यात जाऊन शाहीद याच्याविरुद्घ फिर्याद दिली.