शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटाप्रकरणी एकास अटक

By admin | Updated: July 7, 2017 03:33 IST

महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून उकळलेली दीड लाखाची रक्कम परत करण्याची वेळ आली. त्या वेळी या संकटातून बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून उकळलेली दीड लाखाची रक्कम परत करण्याची वेळ आली. त्या वेळी या संकटातून बाहेर पडण्यासाठी दोन हजारांच्या बनावट नोटा घेऊन आलेला भामटा काळेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बनावट नोटा हातावर टेकवून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. काळेवाडी पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप वसंत बिवलकर (वय ४०, रा. नारायण पेठ,पुणे) असे आरोपीचे नाव आहे. काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नामदेव कदम (वय २०, निसर्ग कॉलनी,नखातेनगर, काळेवाडी) या तरुणाने बिवलकर याच्याविराधोत काळेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी - सीताराम जाधव या रिक्षाचालकाच्या माध्यमातून राहुल कदम या फिर्यादीची आरोपी बिवलकर याच्याबरोबर ओळख झाली. पुणे महापालिकेत, तसेच शासन दरबारी आपली चांगली ओळख आहे. पुणे महापालिकेत काही जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. कोणी असेल तर सांगा, काम करून देतो, अशी बतावणी आरोपीने केली. त्यामुळे राहुल कदम यांनी त्यांच्या नातेवाइकांना नोकरीची संधी मिळत असेल, तर बघा असे सांगितले. खात्रीने काम करून देतो, असे सांगून बिवलकरने त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर मात्र पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. महापालिकेतून मुलाखतीसाठी पत्र आले नाही. बिवलकर याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो टाळू लागला. काम झाले नाही. त्यामुळे पैसे परत करा, असे वारंवार सांगूनही तो प्रतिसाद देत नव्हता. त्याचा शोध घेऊन पैसे परत द्यावेत, असा राहुल कदम यांनी आग्रह धरला. चार-पाच दिवसांपूर्वी त्याने उसने घेतलेले पैसे परत करणार असल्याचे प्रतिज्ञापत्रावर लेखी दिले. लेखी दिले असल्याने आपण अडचणीत येऊ याची भीती वाटल्याने त्याने त्यावर मार्ग काढण्याची शक्कल लढवली. कदम यांना काही रक्कम देऊन लेखी दिलेले प्रतिज्ञापत्र मागता येईल,असे ठरवून बिवलकर निसर्ग कॉलनीत आला. त्याच्याकडे देण्यास पैसे नसल्याने त्याने बनावट नोटा आणल्या. निसर्ग कॉलनीत येऊन बनावट नोटा हाती देऊन प्रतिज्ञापत्र घेऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.