बारामती : विवाहितेच्या विनयभंगप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संबंधित विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपी उमेश हनुमंत भोसले याने विवाहितेस तुझा पती कर्जबाजारी आहे. तू आता आत्महत्या करणार, त्याचे कर्जाचे हप्ते मी फेडतो, असे खोटे सांगून विवाहितेच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. तसेच विवाहितेला तुझ्या गालावर मुंगी पडली आहे, असे सांगून तिच्या गालावर हात फिरविला. तीला चहा करण्यास सांगत तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पतीला ठार मारेन, अशी धमकी दिली. अशी फिर्याद देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव करीत आहेत.(वार्ताहर)
विनयभंगप्रकरणी बारामती येथे एकास अटक
By admin | Updated: April 26, 2017 02:52 IST