पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १, २ आणि ६च्या निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निवडणुकीच्या कामासाठी सुमारे दीड हजार कर्मचारी विविध मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत, असे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले. तसेच सर्व मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केली.देशमुख म्हणाले, ‘‘वडगावशेरी, विश्रांतवाडी, येरवडा आदी भागातून पालिका निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या विविध राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांचे भविष्य मंगळवारी ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. त्यासाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालय पूर्णपणे सज्ज झाले आहे. विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना कोरेगाव पार्क येथील धान्य गोडाऊन परिसरात सकाळी ८ वाजताच बोलावण्यात आले होते. साहित्याचे वाटप सकाळी ८ ते दुपारी १ ेपर्यंत करण्यात आले. (प्रतिनिधी)
दीड हजार कर्मचारी नियुक्त
By admin | Updated: February 21, 2017 03:29 IST