शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना'काळात दीड लाख नवीन वीज जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:11 IST

--- उरुळी कांचन : गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटातही महावितरणच्या पुणे परिमंडलाने उल्लेखनीय कामगिरी करीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ...

---

उरुळी कांचन : गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटातही महावितरणच्या पुणे परिमंडलाने उल्लेखनीय कामगिरी करीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील तब्बल १ लाख ४९ हजार ७८३ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये १ लाख ९ हजार ०१९ नवीन वीजजोडण्या मार्च अखेरपर्यंत, तर विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदी सुरू असताना दि. १ एप्रिल ते १५ मे या दीड महिन्यात तब्बल ४० हजार ७६४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिली.

मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने नवीन वीज जोडण्याचा वेग मंदावला होता. त्यानंतर पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्या देण्याच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात पुणे शहरात ४१४२५ घरगुती, ६२५३ वाणिज्यिक, ६४३ औद्योगिक व ३०९ इतर अशा एकूण ४८ हजार ६३० जोडण्या देण्यात आल्या आहेत. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये २४३८१ वाणिज्यिक, ७६२ औद्योगिक व १६० इतर अशा एकूण २८ हजार ५३२ आणि मुळशी, वेल्हे, हवेली (ग्रामीण), मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये २७६०० घरगुती, ३०७४ वाणिज्यिक, ८०२ औद्योगिक व ३८१ इतर अशा एकूण ३१ हजार ८५७ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

एप्रिलपासून कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या संचारबंदी सुरू आहे.

या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकीकडे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र राबत असलेल्या महावितरणने दि. १ एप्रिल ते १५ मेपर्यंत संचारबंदीच्या खडतर काळात ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत तब्बल ४० हजार ७६४ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे शहरात १६४२५ घरगुती, २२२१ वाणिज्यिक, ११३ औद्योगिक व ७८ इतर अशा १८ हजार ८३७ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ७७३८ घरगुती, १२०६ वाणिज्यिक, २२२ औद्योगिक व ४७ इतर अशा ९२१३ आणि मुळशी, वेल्हे, हवेली (ग्रामीण), मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये ११०९२ घरगुती, १३१८ वाणिज्यिक, १६७ औद्योगिक व १३७ इतर अशा एकूण १२ हजार ७१४ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

--

कोविड सेंटर व रुग्णालयांना नवी जोडणी

यासोबतच पुणे परिमंडलातील सर्व अभियंता व कर्मचारी कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन निर्मिती उद्योग व लसीकरण केद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी युद्धपातळीवर कर्तव्य बजावत आहे. कोरोना संकटाला सामोरे जात विविध ग्राहकसेवा देताना प्रामुख्याने नवीन वीजजोडणी देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे परिमंडलातील अभियंते व कर्मचाऱ्यांचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी कौतुक केले आहे. ग्राहकसेवा देताना कोविड-१९ च्या उपाययोजनांचे पूर्णपणे पालन करावे व आरोग्याची काळजी घेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

---