शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चिमण्यांसाठी एक एकर ज्वारी राखीव, पक्ष्यांच्या रक्षणासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:24 IST

रणगाव (ता. इंदापूर) येथील नितीन मुरलीधर महाडिक या शेतकऱ्याने परिसरातील चिमण्या दुर्मिळ होत असल्याने चारापाणी मिळत नसल्यामुळे त्यांना खाद्यान्न देण्याच्या हेतूने स्वत:च्या शेतातील एक एकर ज्वारी न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

वालचंदनगर : रणगाव (ता. इंदापूर) येथील नितीन मुरलीधर महाडिक या शेतकऱ्याने परिसरातील चिमण्या दुर्मिळ होत असल्याने चारापाणी मिळत नसल्यामुळे त्यांना खाद्यान्न देण्याच्या हेतूने स्वत:च्या शेतातील एक एकर ज्वारी न काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच त्यांनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली आहे.रणगाव (ता. इंदापूर) येथील तरुण शेतकºयाने मुक्या पक्ष्यांच्या सहवेदना जाणून घेतलेल्या आहेत. तीव्र उन्हाळ्यात चिमण्यांना अन्न-पाणी मिळत नसल्यामुळे चिमण्यांचे दु:ख लक्षात घेऊन स्वत:च्या शेतातील ज्वारी सोडून देऊन सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे. नितीन महाडिक या शेतकºयांना लहानपणापासूनच पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दरवर्षी पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत असत. दरवर्षी चिमण्यांचे घटते प्रमाण व चिमण्यांची दुर्मिळता लक्षात घेऊन या वर्षी चिमण्यांना अन्न-पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. घरातील सर्वच सदस्यांनी त्यांच्या निर्णयाला अनुमती दर्शविल्यामुळे आज जवळजवळ १ एकर जमिनीवर असलेली ज्वारी राखण न करता पाखरे न हुसकावण्याचा निर्णय घेतल्याने हजारो चिमण्या या ज्वारीवर ताव मारून पाणी पिऊन भुर्रर्रर्र उडून जाताना दिसत आहेत.परिसरातील पशू-पक्ष्यांकडे माणसाने स्वत:च काळजीपूर्वक लक्ष दिल्यास दुर्लक्षित होणारे पक्षी पुन्हा आपल्याला थव्याथव्याने पाहावयास मिळतील.प्रत्येकाने जमेल तेवढ्या प्रमाणात पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्यास मुक्या पक्ष्यांना आधार मिळणार असल्याचे नितीन याने सांगितले.