शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांत एक एकर भातलागवड

By admin | Updated: July 6, 2017 02:48 IST

माळेगाव (ता. भोर) येथे यंत्राद्वारे शेतात एक एकरवर तीन तासांत भातलागवड करण्याचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर/नसरापूर : माळेगाव (ता. भोर) येथे यंत्राद्वारे शेतात एक एकरवर तीन तासांत भातलागवड करण्याचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ६०० रुपये खर्च आणि दोन मजुरांची गरज लागते. कमी खर्चात अधिक भातलागवड करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचे भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी सांगितले.कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत यांत्रीकीकरणाद्वारे भोर तालुक्यात भात लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, उपसभापती लहू शेलार, मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे, मुकुंद ढावरे, भारत कांबळे, सुनील वाळुंज, नारायण पांगारकर, नथुराम गायकवाड, हरिभाऊ शेलार, संभाजी मांजरे व शेतकरी उपस्थित होते.भोर तालुक्यातील प्रमुख पिक भात असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. आत्तापर्यंत शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होता. त्याला मजूरही मिळत नव्हते आणि खर्चही अधिक प्रमाणात येत होता. वेळही जास्त लागत होता. मात्र, कृषी विभागाच्या आत्मा योजनेतंर्गत तालुक्यात प्रथमच यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड उपसभापती लहु शेलार यांच्या माळेगाव येथील शेतात प्रथमच करण्यात आली.सुमारे एक एकरला तीन तासात भाताची लागवड झाली असून त्यासाठी दोन मजुर आणि यांत्राचा तासाला दोन लिटर डिझेल असा एकूण ६०० रुपये खर्च आला आहे. यापूर्वी एक एकरावर भात लागवडीसाठी ४ हजार रूपये खर्च येत होता. तर २५ ते ३० किलो बियाणे (धांन्य) लागत होते. मात्र गादी वाफ्यावर पेरणी केल्यास फक्त १८ किलोच बियाणे लागते. शिवाय दोनच मजूर लागतात. मजुरीच्या पैशाची बचत होत असल्याने यांत्रिक पध्दतीनेच भात लागवड करावी असे आवाहन शेलार यांनी केले आहे.इंधन खर्चावर यंत्र कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून हातवे खुर्द येथील शेतकरी नितीन रसाळ यांनी ५० टक्के अनुदानावर भात लागवडीचे यंत्र खरेदी केले आहे. या वर्षी भात लागवडीसाठी इंधन खर्चावरच शेतकऱ्यांना सदरचे भातलागवड यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.तालुक्यातील माळेगाव येथे यांत्रिक भात लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला असुन तांभाड, हातवे, आळंदे व नाटंबी येथेही भात लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीऐवजी यांत्रिक पद्धतीचा वापर करून शेती केल्यास बियाणे कमी लागत असून वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी