शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

ओम कांबळे, आकांक्षा गायकवाड अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:42 AM

पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित जसमेल कौर आणि मंगला मळेकर स्मृती आयोजित जिल्हा ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत

पुणे : पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित जसमेल कौर आणि मंगला मळेकर स्मृती आयोजित जिल्हा ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ओम कांबळे, आकांक्षा गायकवाड, अनुष्का देशपांडे, पायल गोरे, अंकिता कोंडे, मनोज रावत, मेलविन थॉमस यांनी आपाल्या गटांमध्ये अव्वल स्थान पटकावले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात डेक्कन जिमखान्याच्या ओम कांबळे याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २४.६ सेकंद वेळ देत अव्वल क्रमांक पटकावला. उंच उडीत डेक्कनच्याच मनोज रावतने (१.७५ मीटर) बाजी मारली. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत एएसएफचा सुमीत खर्बे , तर २००० मीटर धावण्याच्या शर्यतीत एसएसआयचा मोनू यांनी प्रथम क्रमांक पटकावला.निकाल :१६ वर्षांखालील मुले : २००० मीटर धावणे : मोनू (एसएसआय, ६ मिनिटे १०.२ सेकंद), रवीकुमार महातो (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, ६.२६.३), हनुमान चोपडे (ट्रॅक फॉरच्यून, ६.४८.९); ८०० मीटर धावणे : सुमीत खर्बे (एएसएफ , २ मिनिटे ५.४ सेकंद), सौरभ पवार (एएसएफ , २:५.७), सूरज कांबळे (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, २.१२.३); लांब उडी : वृषल बेल्हेकर (ट्रॅक फॉरच्युन, ६.२० मीटर), साहिल नाईक (ट्रॅक फॉरच्युन, ६.०३), प्रतिक साळुंखे (क्रीडा प्रबोधिनी पीसीएमसी, ५.७); उंच उडी : मनोज रावत (डेक्कन जिमखाना, १.७५ मीटर), अभिषेक ढोरे (ज्ञानप्रबोधिनी, १.६०), राहिल तांबोळी (इनव्हेंचर, १.६०); २०० मीटर धावणे : ओम कांबळे (डेक्कन जिमखाना, २४.६ से.), अभिनव झा (इनव्हेंचर, २४.९), श्रेयसा मगर (क्रीडा प्रबोधिनी, पुणे, २५.२); हातोडा फेक : आदित्य नवगिरे (महालक्ष्मी, ४४.५२ मीटर), श्लोक दुधाणे (महालक्ष्मी, ३७.३०), जस मेहता (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, २८.८०).१६ वर्षांखालील मुलींच्या २००० मीटर धावण्याच्या शर्यतीत लक्ष्य अकादमीची आकांक्षा गायकवाड विजेती ठरली. तिने ७ मिनिटे ३०.३ सेकंद अशी वेळ दिली. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात डेक्कन जिमखान्याच्या अनुष्का देशपांडेने २९.६५ मीटर थाळीफेक करीत प्रथम क्रमांक मिळविला. २० वर्षांखालील मुलांमध्ये गोळाफेक प्रकारात मेलविन थॉमस अव्वल ठरला. त्याने १४.४५ मीटर गोळाफेक केली. उंच उडी प्रकारात पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा हृषिकेश काटे प्रथम आला.१६ वर्षांखालील मुली : २००० मीटर धावणे : आकांक्षा गायकवाड (लक्ष्य अ‍ॅकॅडमी, ७ मिनिटे ३०. ३ सेकंद), अनुष्का मोरे (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, ८.०.९), रेश्मा कुमकर (ज्ञा. प्र. म. वि., ८.०८.७); ८०० मीटर धावणे : संगीता शिंदे (क्रीडा प्रबोधिनी, पुणे, २ मिनिटे २७.४ सेकंद), अंबिका मशाळकर (क्रीडा प्रबोधिनी, पुणे, २.४०.१), समीक्षा खरे (संग्राम प्रतिष्ठान, २.५६.२); लांब उडी : युगंधरा गरवारे (हचिंग्ज, ४.७२ मीटर), भक्ती काळे (साई स्पोर्ट्स, ४.६७), आयुषी बंड (सिंहगड, ४.६६); उंच उडी : अवंतिका हेगडे (ज्ञा. प्र. न. वि., १.३८ मीटर), हिमानी खैरे (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, १.३८), पूर्वा भोईरे (ट्रक फॉरच्युन, १.३५).१८ वर्षांखालील मुली : थाळी फेक : अनुष्का देशपांडे (डेक्कन जिमखाना, २९.६५ मीटर), रेणुका विध्वंस (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, २८.४२), मृणाल चोपडे (२२.०२); १०० मीटर हर्डल्स : मानसी पर्वतकर (युनिक स्पोर्ट्स. १५.२ सेकंद), साक्षी येरने (रेसिंग - १६.९), रिशिका नेपाळी (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, १७.००); हातोडाफेक : आर्या कुंटे (महालक्ष्मी, ३९.७० मी.), रितिका शिळमकर (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, ३५.१७), साक्षी मानकर (महालक्ष्मी, ३०.९६); १८ वर्षांखालील मुले : १० किलोमीटर चालणे : आनंद शर्मा (एएसआय, ५१ मिनिटे १०.७ सेकंद), अभिषेक धर्माधिकारी (एनएसएफ , १ तास १२.७ सेकंद), पूनम चंद (एएसआय, १ तास १४.३ सेकंद); भाला फेक : चंदन शिव (एफ टीए, २९.८४ मीटर), अनिकेत झोडगे (ट्रॅक फॉरच्युन, २७.६५), अमन गार्गे (डेक्कन जिमखाना, २४.५१); ११० मीटर हर्डल्स : अभिषेक उभे (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, १४ सेकंद), प्रथमेश कदम (के. पी. पुणे, १६.८), राम वाबळे (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, १७.५)२० वर्षांखालील मुली : थाळी फेक : पायल गोरे (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, २७.७५ मीटर), शितल गोरे (ज्ञा. प्र. न. वि., २२.८३), तन्वी कोंढाळकर (२१.८५); हातोडाफेक : सौरभी वेदपाठक (महालक्ष्मी, ४१.६७ मीटर), मैथिली शिंदे (ट्रॅक फॉरच्युन, ३४.११), ममता चौरसिया (सेंट मिराज, ३३.१५); २०० मीटर धावणे : अंकिता कोंडे (साई स्पोर्ट्स, ३० सेकंद), पायल भारेकर (इनव्हेंचर, ३२), आरती सुतार (साई स्पोर्ट्स, ३३.६); ८०० मीटर धावणे : यमुना लडकत (बीएसए, २ मिनिटे ३४.८ सेकंद), भैरवी थरवळ (बीएसए, २.४५.५), सिद्धी जगताप (इनव्हेंचर, ३:०१.१) २० वर्षांखालील मुले : गोळाफेक : मेलविन थॉमस (साई स्पोर्ट्स, १४.४५ मीटर), दुर्गा माहेश्वर (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, १३.३३), शंतनू उचले (पी. सी. कॉलेज, १२.४६); उंच उडी : हृषिकेश काटे (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, १.८० मीटर), आदित्य खोत (साई स्पोर्ट्स, १.७५), मयूर जाधव (पुणे अ‍ॅथलेटिक्स संघटना, १.६५).