शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पुरातन पुण्याला पुन्हा नवी झळाळी

By admin | Updated: March 20, 2017 04:41 IST

महापालिकेच्या हेरिटेज सेलकडून पुण्यातील जुन्या वास्तूंचे नूतनीकरण करण्यात येत असून, ऐतिहासिक पुण्याचे वैभव पुन्हा

पुणे : महापालिकेच्या हेरिटेज सेलकडून पुण्यातील जुन्या वास्तूंचे नूतनीकरण करण्यात येत असून, ऐतिहासिक पुण्याचे वैभव पुन्हा झळाळून टाकणारी, जुन्या वास्तूंचे खास त्याच शैलीने नूतनीकरण करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. स्वतंत्र अंदाजपत्रक, विशेष अभियंते, स्थानिक नगरसेवकांचा सहभाग व पदाधिकाऱ्यांचे पाठबळ यातून गेल्या काही वर्षांत या कामाला चांगलीच गती मिळाली आहे.नाना वाडा, विश्रामबागवाडा, कसबा गणपती, ओंकारेश्वर मंदिर, मंडई, नागेश्वर मंदिर अशी अनेक कामे त्यांनी त्या त्या वास्तूंच्या जुन्या शैलीतच उभी केली आहेत. आता लाल महाल, त्रिशुंड्या गणपती यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे करताना जुने वीटकाम असेल, तर त्या काळात भाजून तयार केल्या जातात तशा विटा ते तयार करून घेतात. चुन्यामध्ये केलेले बांधकाम असेल, तर त्यासाठी चुन्याची जुन्या काळात लावतात, तशी घाणी लावून चुना तयार केला जातो. लाकूडकाम असेल तर खास तसेच लाकूड आणून त्यावर कोरीव काम केले जाते. दगडी बांधकाम असेल, तर त्याच प्रकारचे दगड घडविले जातात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता अशा प्रकारचे काम करणाऱ्या ठेकेदारांचीही एक टीम तयार झाली आहे. सिमेंट काँक्रिटचे जंगल होत चाललेल्या पुण्यात या विभागाच्या कामांमुळे ठिकठिकाणी अशा आनंद देणाऱ्या वास्तू उभ्या राहिल्या आहेत.अनेक शतकांचा इतिहास असलेल्या पुणे शहरात असंख्य धार्मिक स्थळे, जुन्या वास्तू आहेत. मात्र, काळाच्या ओघात त्यांची पडझड झाली होती. सन २००४ मध्ये महापालिकेने या वास्तूंचे नूतनीकरण करण्यासाठी म्हणून स्वतंत्रपणे हेरिटेज सेल स्थापन केला. त्यासाठी दर वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्याचा निर्णय घेतला. या कक्षाचे प्रमुख म्हणून अभियंता शाम ढवळे यांची निवड झाली. त्यांनी अशा प्रकारच्या वास्तूंच्या नूतनीकरणासाठी डेक्कन महाविद्यालयात असलेला खास अभ्यासक्रम पूर्ण केला. शिवाजी लंके, सुनील मोहिते, वर्षा जाधव, पौर्णिमा गायकवाड या अभियंत्यांनाही अशा प्रकारच्या कामात रस होता. त्यांचीही या कक्षात नियुक्ती झाली. या टीमने मग स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, त्या त्या परिसरातील नागरिकांचे सहकार्य मिळवीत गेल्या काही वर्षांत अनेक वास्तूंचे जुन्या शैलीत नूतनीकरण केले आहे. त्यातून पुणे शहराला आता एक वेगळी ओळख मिळू लागली आहे. दर वर्षी महापालिकेकडून या विभागासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद केली जाते.