शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून पदाधिकाऱ्यांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2015 03:17 IST

महापौर चषक स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर एका बाजूला, तर अन्य पदाधिकारी दुसऱ्या, अशी स्थिती आज झाली.

पुणे : महापौर चषक स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर एका बाजूला, तर अन्य पदाधिकारी दुसऱ्या, अशी स्थिती आज झाली. छत्रपती शिवाजी आखाडा की कात्रज मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल याचा अंतिम निर्णय आता महापौरांनी राखीव ठेवला आहे. दरम्यान, यंदापासून अर्जुन, द्रोणाचार्य हा केंद्राचा व शिवछत्रपती हा राज्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या पुुणेकर खेळाडूंना १ लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, काँग्रेसचे गटनेते, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे राजेंद्र वागस्कर , क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र पठारे आदी उपस्थित होते. मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी कुस्ती मैदान हे मध्यवस्तीत आहे. या मैदानावर ऐतिहासिक कुस्ती झाल्या आहेत. त्यामुळे महापौर कुस्ती स्पर्धा या मैदानावर घ्याव्यात,असा आग्रह काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी धरला. मनसेचे वागस्कर यांनीही याला पाठिंबा दिला. मात्र, कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे स्पर्धा घ्यावी, असा आग्रह खुद्ध महापौरांनीच धरला. बऱ्याच चर्चेनंतरही यावर काही निर्णय होऊ शकला नाही. महापौरांनीच यावर आपण नंतर निर्णय जाहीर करू, असे सांगितले. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य हे पुरस्कार मिळवणाऱ्या पुणेकर खेळाडूला एक लाख रुपये देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंपासून ही सुरूवात करणार असल्याची माहिती महापौर धनकवडे यांनी दिली. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान होणाऱ्या महापौर चषक स्पर्धेत २८ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी एकूण अडीच कोटी रूपये खर्च येईल, असा अंदाज आहे. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी खर्चात बचत करण्याचा प्रयत्न आहे, असे महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी)