शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाणपुलाच्या चर्चेसाठी पदाधिकाऱ्यांना भेट नाकारली

By admin | Updated: March 26, 2017 01:16 IST

भिगवण रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या विरोधाबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कृती समितीच्या

भिगवण : भिगवण रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या विरोधाबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी भेट नाकारली. कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे यांनी भिगवण गावच्या महिला सरपंच हेमाताई माडगे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि उड्डाणविरोधी कृती समितीच्या ५० हून अधिक ग्रामस्थांना भेट नाकारल्याने भिगवण ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता धनंजय धुमाळ यांनी सरपंच आणि उड्डाणपूलविरोधी कृती समितीच्या सदस्यांना पुलाविषयी चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे भिगवण येथे येणार असल्याचे सांगितले. तसेच भिगवण येथील बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात सकाळी १० वाजता हजर राहण्याविषयी सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे बडे अधिकारी येणार असल्याने भिगवण गावच्या सरपंच हेमाताई माडगे यांनी सर्व सदस्य आणि उड्डाण पूल विरोधी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना निरोप देवून १० वाजता विश्रामगृहात पोहोचले. तसेच, अधिकाऱ्यांचीवाट पाहिली. सुमारे चार तासांचा अवधी उलटूनही कोणत्याही अधिकाऱ्याने या ठिकाणी थांबलेल्या ग्रामस्थ आणि सरपंच यांची भेट घेतली नाही. तसेच तीन वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर अभियंता धुमाळ यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ‘साहेब’ परस्पर पुलाच्या जागेला भेट देऊन पुण्याकडे रवाना झाल्याचे सांगितले. उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी सांगितले, की कार्यकारी अभियंता येणार असल्याचे समजल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामस्थ आपले कामधंदे सोडून उपाशीपोटी वाट पाहत होते. (वार्ताहर)