शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी बदलाला पूर्णविराम

By admin | Updated: February 13, 2016 03:15 IST

राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आतापर्यंत जिल्हा परिषदेत अनेकांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. तसेच पक्षाच्या वतीने चांगले काम करणाऱ्यांना प्रमोशन (बढती)

पुणे : राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आतापर्यंत जिल्हा परिषदेत अनेकांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. तसेच पक्षाच्या वतीने चांगले काम करणाऱ्यांना प्रमोशन (बढती) देखील दिले जाते, असे सूचक विधान करत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदला पूर्णविराम दिला असल्याची चर्चा रंगली आहे.जिल्हा परिषदेच्या कुपोषणमुक्त पुणे जिल्हा, सप्ततारांकित आरोग्य योजना, शंभर टक्के शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी कार्यक्रम या प्रमुख योजनांचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी, सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पवार म्हणाले, पुणे जिल्हा हा राज्यात प्रगत व शाश्वत विकास करणारा जिल्हा आहे. पुण्याने देशाला आणि राज्याला शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय ठेवा दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुळातच कुपोषित मुले जन्माला येऊच नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याशिवाय मुलींच्या जन्मदराचे प्रमाणदेखील निराशाजनक असून, हे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पुणे जिल्ह्याचा वार्षिक विकास आराखाडा पूर्वी केवळ ४० कोटींचा होता. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रस सत्तेत असताना तब्बल ६०० हजार रुपयांपर्यंत वाढवला. परंतु आता त्यात मोठी कपात करण्यात आली आहे. निधीच नसला तर अधिकारी आणि पदाधिकारी विकासकामे कशी कारणार? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. जिल्ह्यासाठी जास्तीचा निधी मिळावा यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी कंद यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उमाप यांनी तर शुक्राचार्य वांजळे यांनी आभार मानले.