शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

पगार काढण्यासाठी अधिकारीच मिळेना

By admin | Updated: January 24, 2017 02:53 IST

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वेतन पथकाची (पे-युनिट) जबाबदारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली

पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वेतन पथकाची (पे-युनिट) जबाबदारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पे-युनिटची जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. परंतु, यामुळे पुणे विभागातील खासगी प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून विनावेतन काम करावे लागत आहे.पुणे विभागाच्या वेतन पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या कामाची जबाबदारी मदन हगवणे यांच्याकडे देण्यात आली. परंतु, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बी. एम. बोरनारे यांच्याकडे वेतन पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. मात्र, बोरनारे यांनीही हा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे काही शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांची भेट घेऊन पे-युनिटमध्ये काम करण्यास अधिकारीच नाही, अशी तक्रार केली. त्यावर नांदेडे यांनी बोरनारे यांना दूरध्वनीवरून खडसावले. त्यावर या पदाची जबाबदारी घेऊ नको, तुला दोन महिन्यांत घरी बसवू, अशी धमकी मला देण्यात आल्याने मी हा पदभार स्वीकारत नसल्याचे बोरनारे यांनी त्यांना सांगितले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली असून, आयुक्त कार्यालयास कळविले असल्याचे नमूद केले.